MRI Scanning तपासणी :

मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (Magnetic Resonance Imaging) म्हणजेच MRI तपासणी. आज MRI स्कॅनिंग तपासणीचा उपयोग विविध आजारांच्या निदानासाठी केला जात आहे. MRI स्कॅनिंग तपासणीवेळी कोणताही विशेष त्रास होत नाही. MRI स्कॅनिंग हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे.

MRI मध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड व रेडिओ लहरींचा वापर केला जातो. त्यामुळे MRI स्कॅनिंगमध्ये शरीरातील अवयवांच्या अगदी रिमार्केबल अशा चांगल्या images कॉम्प्युटरद्वारे निघतात. त्या images वरून एखाद्या आजाराचे निदान करण्यासाठी मदत होते.

MRI तपासणीचा उपयोग :

अनेक आजारांच्या निदानासाठी MRI तपासणीचा उपयोग केला जातो. MRI हे मुख्यत्वे करून सॉफ्ट टिश्युजच्या एरीया जसे मसल्स (स्नायू) नर्व्हज, मेंदु व इतर अवयवांच्या परीक्षणासाठी उपयोगात येत असते. त्यामुळे मेंदुचे विकार, नाडयांचे विकार, स्नायुंचे विकार, मनक्याचे विकार, सांध्यातील समस्या, लिव्हरच्या समस्या, कँसर इत्यादीच्या निदानासाठी MRI उपयुक्त ठरते.

MRI तपासणीसाठी किती वेळ लागतो..?

तपासणीसाठी किती वेळ लागेल हे शरीरातील कोणत्या भागाची तपासणी केली जात आहे त्यावर अवलंबून असतो. MRI scanning साठी साधारण 30 ते 60 मिनीटे लागू शकतात.

MRI स्कॅन तपासणी आणि महत्त्वाच्या सुचना :

आपले डॉक्टर तपासणीच्यापूर्वी आपणास काही सूचना देतील. तपासणीआधी सैलसर गाऊन घालण्यासाठी देतात. तसेच मुख्य म्हणजे, MRI तपासणी करण्यापूर्वी आपल्याजवळील अंगठी, चैन, लॉकेट वैगरे मेटलच्या वस्तू बाजूला काढून ठेवाव्यात. कारण MRI मध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटचा (चुंबकाचा) वापर केला जातो.

स्कॅनिंगवेळी MRI मशीन खूप मोठा आवाज करत असते. अशावेळी कानात घालण्यासाठी इअरप्लगचा वापर करता येईल. या तपासणीसाठी न हालता शांत झोपून राहणे गरजेचे असते. ज्यांच्यासाठी शांत झोपून राहणे त्रासदायक असते त्यासाठी फिजिशीयनशी आधी चर्चा करून झोपेसंबंधित औषध घेता येऊ शकेलं. यासंबंधी तुम्ही तिथे कार्यरत असणाऱ्या तंत्रज्ञाशीही बोलून घ्यावे.

MRI तपासणी कशी करतात..?

MRI तपासणीसाठी स्कॅनिंग रूममध्ये गेल्यावर स्कॅनर टेबलवर झोपवले जाते. त्यानंतर स्कॅनर टेबल हा मॅग्नेटिक फील्डमध्ये सरकतात व MRI स्कॅनिंग तपासणी सुरू केली जाते. तपासणीनंतर radiologist कम्प्युटरद्वारे images ची तपासणी करतात व तपासणीचा रिपोर्ट तयार करून देतात.

MRI तपासणीचे दुष्परिणाम :

MRI ही सुरक्षित अशी निदानपद्धत आहे. MRI तपासणीचे साईड इफेक्ट फारसे नाहीत. तपासणीनंतर काहीजणांना डोकेदुखी, अंगदुखी असे किरकोळ त्रास होऊ शकतात.

MRI तपासणीसाठी येणारा खर्च :

शरीरातील कोणत्या भागाची तपासणी करायची आहे त्यानुसार cost अवलंबून असतात. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशाठिकाणी MRI scanning साठी साधारण 3000 ते 15000 पर्यंत MRI तपासणीसाठी खर्च येऊ शकतो.

Read Marathi language article about MRI scan.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.