रजोनिवृत्ति सामान्य माहिती

252
views

रजोनिवृत्ति :
रजोनिवृत्ति म्हणजे स्त्रीमध्ये जेंव्हा रजस्त्राव होणे पूर्णतः बंद होते त्या अवस्थेस रजोनिवृत्ति असे म्हणतात. रजोनिवृत्ति ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर येणारी एक सामान्य अवस्था असते. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या प्रजनन अवयवामध्ये क्षीणता येण्यास सुरवात होते, शरीरामध्ये हॉर्मोनल परिवर्तन होते आणि त्यामुळे मासिकस्त्राव अंतिमतः बंद होण्यास सुरवात होते.

रजोनिवृत्ती काळ :
रजोनिवृत्ती 40 ते 55व्या वर्षी प्रामुख्याने आलेली आढळते.
रजोनिवृत्ती काळाचे सरासरी वय हे 47 वर्ष इतके आहे.

कालावधीजन्य विकृती –
जर वयाच्या 40शी पुर्वीच आल्यास त्या विकृतीस ‘अकाली रजोनिवृत्ती’ (Precocious Menopause) असे म्हणतात.
आणि वयाच्या 55व्या वर्षानंतर जर रजोनिवृत्ती झाल्यास त्या विकृतीस ‘विलंबित रजोनिवृत्ती’ (Delayed Menopause) असे म्हणतात.

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.

का येते रजोनिवृत्ती..?
वाढत्या वयानुसार शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात आणि ते स्वाभाविकच असतात. प्रत्येक महिन्याला येणाऱया मासिक स्त्रावामध्ये बदल होणे व क्रमाक्रमाने मासिक स्त्राव येणे थांबणे म्हणजे रजोनीवृत्ती.
स्त्रीयांमधील डिम्बग्रंथीत वाढत्या वयाबरोबर निष्फलता उत्पन्न होते. त्यामुळे शरीरात ईस्ट्रोजेनचा अभाव निर्माण होऊन रजोनिवृत्ती उत्पन्न होते.
साधारणतः पूर्ण वर्षभर जर मासिक स्त्राव आला नसेल तर निश्चितपणे रजोनीवृत्ती सुरु झाली असे म्हणता येईल.

रजोनिवृत्तीमध्ये आढळणारी लक्षणे :
शारीरीक, मानसिक आणि भावनिक स्तरावर रजोनिवृत्तीमध्ये खालिल लक्षणे उत्पन्न होतात.
◦ शारीरीक थकवा जाणवणे,
◦ अंगदुखी, डोकेदुखणे, कंबर आणि सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणे,
◦ अनुत्साह, आळस येणे,
◦ चिडचीड होणे,
◦ छातीत धडधडणे,
◦ त्वचा कोरडी होणे,
◦ हाडे ठिसूळ होणे,
◦ भुक मंदावणे,
◦ झोप न लागणे ही लक्षणे रजोनिवृत्ती कालामध्ये व्यक्त होतात.

Menopause information in Marathiप्रतिक्रिया द्या :