रजोनिवृत्तिमध्ये घ्यावयाची काळजी

1324
views

रजोनिवृत्तिमध्ये घ्यावयाची काळजी :
रजोनिवृत्ति म्हणजे स्त्रीमध्ये जेंव्हा रजस्त्राव होणे पूर्णतः बंद होते त्या अवस्थेस रजोनिवृत्ति असे म्हणतात. रजोनिवृत्ति ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर येणारी एक सामान्य अवस्था असते. रजोनिवृत्ती 40 ते 55व्या वर्षी प्रामुख्याने आलेली आढळते. रजोनिवृत्तीची भीती मनातून काढून टाकावी. रजोनिवृत्ती ही एक स्वाभाविक अवस्था असून त्याविषयी भयभीत होण्याचे काहीच कारण नाही.

रजोनिवृत्तीतील आहार :

  • रजोनिवृत्तीमध्ये आहाराकडे विशेष ध्यान देणे आवश्यक असते. पौष्टिक, सहज पचणारा, शक्तीवर्धक आहार घ्यावा.
  • हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, विविध फळे, तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करावा.
  • या अवस्थेमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे आहारात कैल्शियम युक्त पदार्थांचा समावेश ठेवावा.

रजोनिवृत्तीतील विहार :

  • रजोनिवृत्ती अवस्थेमध्ये हलका व्यायाम करावा,
  • सकाळ-संध्याकाळी फिरावयास जावे,
  • योगासने करावित.


प्रतिक्रिया द्या :