गोवर विषयी जाणून घ्या

162
views

गोवर (Measles) :
हा एक एक संसर्गजन्य असा विकार आहे. लहान मुलांना गोवर होतो पण तसा तो प्रौढांनाही होऊ शकतो. या व्याधीमध्ये प्रथम ताप येऊन 5 ते 7 दिवसानंतर चेहरा, उदर आणि पाठीवर बारीक आकाराचे पुरळ उमटतात.

रोग कारण –
या रोगाचा विषाणू RNA paramyxo virus असून, त्याच्या संसर्गाने हा रोग होतो.
हा रोग 3 ते 5 वर्षांच्या बालकांमध्ये अधिकतेने होतो. वयाच्या दहा वर्षानंतर हा रोग होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
गोवर झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यातून, शिंकण्यातून तसेच स्पर्शामधूनही गोवराचा प्रसार होतो.

रोग संचयकाळ –
8 ते 12 दिवस

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.

रोग लक्षण –
ताप, अशक्तपणा, नाक वाहणे, शिंका येणे, अंगदुखी, डोळ्यांची जळजळ व खोकला ही गोवराची मुख्य लक्षणे. त्यानंतर दोन चार दिवसांमध्ये अंगावर लालसर पुरळ उठते. ती आधी चेहऱ्यावर व नंतर पूर्ण अंगभर पसरते.
पुरळ पायापर्यंत पोहोचेतोवर ताप उतरतो व गोवर मावळताना पुरळही कमी होत तपकिरी रंगाची होते.प्रतिक्रिया द्या :