वजन कमी करण्यासाठी स्मार्ट टिप्स

14982
views

वजन कमी करण्यासाठी स्मार्ट टिप्स :
येथे आम्ही काही उपाय दिले आहेत ज्याचा फायदा Weight Loss करण्यासाठी तुम्हाला होईल. आज कालच्या धावपळीच्या युगात कोणालाही व्यायाम करायला वेळ नसतो ज्यामुळे वजन वाढून पोटाचा घेर वाढलेला असतो त्यामुळे तुम्ही जाड दिसता.

वजन कमी करण्यासाठी उपाय :

 • रोज २ ते ३ लिटर पाणी पिणे.
 • कोल्ड्रींक पिऊ नये त्याएवजी नारळ पाणी, लिंबूपाणी, व्हेजिटेबल सूप किंवा मठ्ठा प्यावे.
 • ग्रीन टी पिणे सुद्धा वजन कमी करण्यास लाभदायी आहे.
 • सकाळच्या वेळी दिवसांची सुरुवात मध, लिंबू आणि गरम पाणी एकत्र करून पिण्याने करा.
 • झोपण्याच्या ३ ते ४ तास अगोदर जेवण करावे.
 • भूख लागल्यावरचं जेवा मात्र भरपेट जेवू नये.
 • मोड आलेली कडधान्ये, कच्च्या पालेभाज्या व फळभाज्या आणि फळे खाणे योग्य.
 • जेवण झाल्यानंतर कोमट पाणी पिल्यानं वजन लवकर कमी होतं. परंतु, जेवण झाल्यानंतर जवळपास पाऊण किंवा एका तासानं एक ग्लास पाणी प्यायला हवं.
 • मैद्याचे पदार्थ, बेकारी प्रोडक्ट, चिप्स, चॉकलेट्स खाऊ नयेत.
 • मिठाई आणि साखर, मिठ कमी खावे.
 • जेवण पूर्ण बंद करू नये.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम :

 • नियमित व्यायाम, योगासने करावित.
 • दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम करावा.
 • चालण्याचा व्यायाम, पळण्याचा व्यायाम तसेचं सायकलिंग, पोहणे, जिन्याच्या पायऱ्या चढणे-उतरणे यासारखे व्यायाम करावेत.
 • आठवड्यातून किमान 4 ते 5 दिवसतरी व्यायाम करणे आवश्यक.
 • व्यायाम सुरु करताना सुरवातीस कमी प्रमाणात करुन दररोज थोडा-थोडा व्यायाम वाढवत जावा. एकाच दिवशी जास्त प्रमाणात व्यायाम करु नये.

हे खाणे टाळाचं…
तेलकट पदार्थ, तुपाचे पदार्थ, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बेकारी प्रोडक्ट, चिप्स, चॉकलेट्स, जंकफूड, फास्टफूड खाऊ नयेत.
जास्त कर्बोदके असणाऱ्या पदार्थांपासून दूर रहा. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट असते. यामुळे चरबी वाढते.प्रतिक्रिया द्या :