कशी घ्यावी यकृताची काळजी


कशी घ्यावी यकृताची काळजी :
यकृत हे शरीरातील एक अतिमहत्वाचे असे अवयव आहे. पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची अशी भुमिका असते. खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे त्यानंतर त्याचे रस, रक्तादी धातूत रुपांतर करण्यासाठी यकृताचे महत्वपूर्ण योगदान असते.
याशिवाय शरीरातील अपायकारक विषारी घटकांचे निचरा करण्याचे महत्वपुर्ण कार्य हे यकृतावरच अवलंबुन असते. म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी यकृताचे आरोग्य चांगले असणे आवश्यक असते.
कोणत्याही कारणांनी जर यकृतामध्ये बिघाड झाल्यास वरील महत्वाच्या क्रिया सुरळितपणे होण्यास बाधा पोहचते.

यकृत हा असा अवयव आहे की जो अविरतपणे काम करत असतो. आहाराचे पचन झाल्यानंतर त्याचे, सर्व शरीर सुरळीत चालवण्यासाठी मुख्य असणाऱया रक्तात रुपांतर करण्याचे महत्वाचे कार्य यकृतामार्फतच केले जाते. रक्ताशिवाय जीवनाची कल्पनाच करता येणे शक्यच नाही त्यामुळे यकृतासारख्या महत्वपूर्ण अवयवाची काळजी घ्यावी लागते.

यकृताच्या कार्यास बाधा आणणारे घटक –
यकृत विकारांमुळे यकृताच्या कार्यास अडथळा निर्माण होते.
यकृत विकार अनेक प्रकारचे असतात. जसे, यकृताचा आकार वाढणे, यकृताला सुज येणे हिपॅटायटिस, लिव्हर सिरॉसिस, यकृताचा कैन्सर, कावीळ या सारखे यकृत विकार असतात. याशिवाय पचनसंस्थेचे विकार, पित्ताशयाचे विकार यांमुळेसुद्धा यकृताच्या कार्यावर विपरित परिणाम होतो.
◦ अयोग्य आहाराच्या सेवनामुळे यकृतामध्ये बिघाड निर्माण होतो.
पित्तवर्धक उष्ण, तीक्ष्ण, अतितिखट, खारट, आंबट, मसालेदार आहारामुळे यकृताचे आरोग्य बिघडते.
◦ पचण्यास जड, तेलकट, चरबीयुक्त पदार्थांच्या अतिसेवन करणे,
◦ दुषित पदार्थ, रासायनिक घटकांचा अंश असणारे पदार्थांच्या सेवनाने,
◦ अति प्रमाणात मद्यपान करणे,
◦ तंबाखू, चुना, सुपारी यांच्या व्यसनामुळे अनेक विषारी घटक शरीरात गेल्याने,
रात्री जागरण करणे,
◦ मानसिक भय, शोक, क्रोध, ताणतणावांमुळे यकृताचे आरोग्य बिघडते.

यकृताच्या आरोग्यासाठी स्मार्ट टिप्स –
◦ पित्तशामक आहार घ्यावा.
◦ स्निग्ध पदार्थांचे मर्यादितच वापर करणे – चरबीयुक्त, स्निग्ध पदार्थांच्या अतिसेवनामुळे रक्तातील चरबीचे आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते त्यामुळे फैटी लिव्हर हा यकृत विकार उद्भवतो.
यासाठी चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करु नये.
◦ मद्यपान, तंबाखू सेवन करु नये.
◦ रात्री पुरेशी झोप घ्यावी. जागरण करणे टाळावे.
◦ मानसिक ताणतणाव रहित रहावे.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :