मुतखडा विषयी जाणून घ्या

345
views

किडनी स्टोन्स, मुतखडा सामान्य माहिती :
हा विकार किडनी स्टोन्स, मुत्राश्मरी, मुतखडे , Urinary calculi, Urolithiasis, Nephrolithiasis या अन्य नावांनीसुद्धा ओळखला जातो.
किडनीमध्ये खनिज क्षार जमा झाल्याने मुतखडे निर्माण होतात. बहुतांशवेळा किडनी स्टोन्स हे कॅल्शियम पासून बनलेले आढळतात. तसेच युरीक एसिड आणि ऑक्सॅलेट पासूनही किडनी स्टोन्स बनतात. हे खडे किडनीमधून युरेटर नामक संकिर्ण नळीद्वारे मुत्राशयात येत असतात. मुतखड्यांमुळे मुत्राच्या मार्गात अवरोध (Block) निर्माण होतो.

मूतखड्याच्या विकारामुळे आज अनेकजन त्रस्त असलेले आढळतात. हा विकार स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. मुतखडे मुत्रसंस्थेतील कोणत्या अवयवात आहे हे सर्वप्रथम पाहणे आवश्यक असते. जेंव्हा मुतखडे हे किडनी मध्ये असतात तेँव्हा विषेश वेदना जाणवत नाहीत. मात्र किडनीतील खडे जेंव्हा मुत्रवाहिनीतून मुत्राशयात सरकू लागतात तेंव्हा मात्र वेदना जाणवतात. मुतखड्याचा आकार लहान असल्यास लघवीवाटे सहजतेणे बाहेर पडू शकतो. मात्र 3mm पेक्षा अधिक मोठ्या आकाराचा खडा मुत्रवाहीनीमध्ये अडकतो. त्यामुळे मुत्राच्या मार्गात अवरोध निर्माण होतो आणि अत्यंत वेदनादायक पीडा निर्माण होतात.

मुतखडा हा विकार सुरवातीच्या अवस्थेमध्ये असल्यास औषधांद्वारे बरा होऊ शकतो. मात्र वेळीच योग्य उपचार न केल्यास मुतखड्याच्या आकारात वाढ होते. अशा वेळी शस्त्रक्रमाद्वारेच मुतखडा काढावा लागतो.

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.प्रतिक्रिया द्या :