काविळविषयी जाणून घ्या

222
views

काविळ (Jaundice) :
काविळ हा यकृताचा विकार असून त्याला Jaundice, Icterus किंवा कामला या अन्य नावांनेसुद्धा ओळखतात. काविळीमध्ये त्वचा, नखे आणि डोळे पिवळसर होतात.
रक्तामध्ये बिलीरुबीन [Bilirubin] चे प्रमाण वाढल्याने काविळीची स्थिती उद्भवते.

काविळ विकृतीविज्ञान –
बिलीरुबीन हा तांबड्या पेशींमध्ये आढळणारा पिवळसर लाल रंगाचा घटक पदार्थ असतो. यकृताद्वारे हा पदार्थ रक्तातून काढून टाकला जातो. त्यानंतर Bilirubin पित्ताशयत पाठवला जातो. त्यानंतर तो पदार्थ मलावाटे बाहेर टाकला जातो.
जर हा पदार्थ मलावाटे बाहेर टाकला गेला नाही तर त्याची रक्तामध्ये Bilirubin ची अधिक वाढ होते त्यामुळे त्वचा, नखे, डोळे पिवळ्या रंगाची होतात.

काविळीची कारणे –
◦ विविध यकृत विकारांमुळे काविळ उद्भवू शकते. उदा. हिपाटायटिसमुळे, यकृत संक्रमणामुळे, यकृत कैन्सरमुळे काविळ उद्भवते.
◦ पित्ताशय विकारांमुळे कावीळ उद्भवू शकते. उदा. पित्ताशयात खडे झाल्यामुळे, पित्ताशय शोथ या विकारामुळे.
◦ पित्ताशय नलिकेमध्ये पित्त निघण्याच्या मार्गात अवरोध झाल्याने काविळ उद्भवते. जसे, पित्ताशयात खडे झाल्याने अवरोध निर्माण होतो.
◦ अत्यधिक मद्यपानामुळे, विविध औषधे, विषारी घटकांचे सेवनाने काविळ उद्भवते, कारण अशा पदार्थांच्या सेवनाने यकृतामध्ये अपायकारक विषारी घटकांची वृद्धि होते. त्यामुळे काविळीची स्थिती उद्भवते.

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.

कावीळ लक्षणे –
◦ त्वचा, नख, डोळे पिवळ्या रंगाची होणे,
◦ भूक मंदावणे,
◦ मळमळणे,
◦ उलटी होणे,
◦ त्वचेला खाज सुटणे,
◦ ताप येणे,
◦ उदर, पोटामध्ये वेदना होणे,
◦ गडद मुत्रत्याग होणे,
रंगाचा मलत्याग होणे ही लक्षणे काविळीमध्ये आढळतात.

काविळीचे निदान कसे करतात –
रुग्णाची त्वचा, डोळे, नखे तपासणीद्वारे काविळीचे निदान केले जाते.
याशिवाय खालील वैद्यकीय चाचण्यांचा काविळीच्या निदानासाठी आधार घ्यावा लागतो.
◦ रक्त तपासणी – रक्तातील Bilirubin चे प्रमाण तपासले जाते.
◦ मुत्र तपासणी

प्रतिबंधात्मक उपाय –
◦ मद्यपान करणे टाळावे,
◦ हिपाटायटिसमुळे काविळ होऊ नये काळजी घ्यावी,
◦ हिपाटायटिस A आणि B च्या लसी नियमित घ्याव्यात.प्रतिक्रिया द्या :