नपुसंकता सामान्य माहिती व कारणे

2362
views

Impotence information in Marathi

नपुसंकता सामान्य माहिती व कारणे –
हा एक मनौलैंगिक विकार असून या विकाराने ग्रस्त व्यक्ती ही मैथुन क्रिया करण्यास असमर्थ असते. या विकारामध्ये प्रामुख्याने संम्भोगक्रियेवेळी शिस्नामध्ये उत्थान (लैंगिक ताठरता) येत नाही.
नपुसंकतेची कारणे ही प्रामुख्याने मनौदैहिक असतात.

मानसिक कारणे –
नपुसंकतेचे प्रमुख कारण हे मनासिच संलग्न असतात जसे भय, चिंता, तनाव, नैराश्य, शोक, लज्जा या सारख्या मानसिक कारकांमुळे ही विकृती उत्पन्न होते.
अनेक व्यक्ती स्वतःमध्ये लैंगिक कमतरता आहे असे समजुन निराशेने ग्रासतात. आणि आपण मैथुन क्रिया करण्यास असमर्थ आहोत अशी स्वतःच धारणा करुन घेतात. एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, जगातील जेवढे पुरुष स्वतःला नपुसंक समजतात त्यापैकी 95% पुरुष हे वास्तवतः नपुसंक नसतातच. त्यांच्या मनामध्येच न्युनगंडतेची भावना निर्माण झालेली असते. आणि उरलेले 5% पुरुषांमध्ये जनन अवयवांमधील विकृती उत्पन्न त्यामध्येच खऱ्‍याअर्थाने नपुसंकता आढळते.

शारिरीक कारणे –
शरीरामध्ये विकृती उत्पन्न झाल्याने, हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे तसेच विशिष्ठ रोग उत्पन्न झाल्याने शारिरीक नपुसंकता उत्पन्न होते. शारिरीक नपुसंकतेलाच वास्तविक नपुसंकता मानली जाते.
◦ विशिष्ठ रोगांच्या उपद्रवामुळे उद्भवणारी नपुसंकता –
मधुमेह, कर्णशुलशोथ Mumps तीव ज्वर, रक्ताल्पता, स्थुलता, नाडी संबंधी रोग, हृद्यरोग, स्क्लेरोसिस, कुपोषण, गनोरिया, ल्युकीमिया या रोगांच्या उपद्रवातून नपुसंकता उत्पन्न होऊ शकते.
◦ जन्मजात जनन अवयवांतील विकृती,
◦ जननेंद्रिय संबधी विकार,
◦ अत्यधिक मद्यपान, धुम्रपान, अमली पदार्थांच्या दिर्घकालीन सेवनामुळे,
◦ वार्धक्यामुळे प्रकृतीनुसार वयामध्ये वाढ झाल्याने, शरीर क्षीण झाल्याने,
◦ मानसिक तनाव, डिप्रेशन, उच्च रक्तदाब यासारख्या रोगांवर घेतलेल्या औषधांच्या अतिवापरामुळे नपुसंकता उत्पन्न होते.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :