किती प्रकारचा असतो हिपाटायटिस


किती प्रकारचा असतो हिपाटायटिस..?
हिपाटायटिसचे मुख्यतः पाच प्रकार आहेत. ते प्रकार यकृताला संक्रमित करणाऱया विषाणूंच्या Virus नावाने ओळखले जातात.

[1] हिपाटायटिस ए –
कारक विषाणू – Hepatitis A virus च्या संक्रमणामुळे हा प्रकार होतो.
संक्रमण घटक – Hepatitis A virus मुळे संदुषित आहार, पाण्याचे सेवन केल्याने हिपाटायटिस ए होतो.

[2] हिपाटायटिस बी –
कारक विषाणु – Hepatitis B virus च्या संक्रमणामुळे हा प्रकार होतो.
संसर्ग घटक – Hepatitis B virus मुळे बाधीत व्यक्तीच्या रक्त, थुंकी, लाळ, मल, मुत्र, वीर्य, लैंगिक संबंधातून याचा प्रसार होत असतो. हिपाटायटिस बी बाधीत गर्भीणीद्वारे नवजात बालकामध्ये प्रसार होत असतो.

[3] हिपाटायटिस सी –
कारक विषाणू – Hepatitis C virus च्या संक्रमणातुन हा प्रकार होतो.
संसर्ग माध्यम – हिपाटायटिस सी बाधीत व्यक्तीच्या रक्तदानातून, अवयव प्रत्यारोपनामुळे याचा प्रसार होत असतो.
तसेच हिपाटायटिस सी बाधीत व्यक्तीच्या स्वच्छता साधणांचा जसे, साबण, टुथब्रश, टॉवेल, कपडे, रेझर्स इ. चा वापर केल्यास याचा संसर्ग होतो आणि हिपाटायटिस सी उत्पन्न होतो.

[4] हिपाटायटिस डी –
कारक विषाणू – Hepatitis D virus च्या संक्रमणामुळे हा प्रकार होतो.
संसर्ग माध्यम – हिपाटायटीस डी बाधीत रुग्णाच्या दुषित सुई, इंजेक्शनद्वारे तसेच बाधीत व्यक्तिच्या लैंगिक संबंधातून याचा संसर्ग होत असतो.

[5] हिपाटायटिस ई –
कारक विषाणू – Hepatitis E virus च्या संक्रमणामुळे हा प्रकार होतो.
संसर्ग माध्यम – अविकसनशील गरीब देशांमध्ये हिपाटायटिस ई चे प्रमाण अधिक आहे.
दुषित आहार, दुषित पाणी, स्वच्छतेचा अभाव यातून हिपाटायटिस ई चा प्रसार होत असतो.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :