हृद्याचे आरोग्य कसे राखाल

90
views

हृद्याचे आरोग्य कसे राखाल :
आरोग्याच्या दृष्टिने हृद्याचे कार्य अत्यंत महत्वाचे असते. किंबहूना जीवंत राहण्यासाठी हृद्य महत्वाची भुमिका निभावत असतो. हृद्याची कार्यक्षमता उत्तम असणे हे एक निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. लोकांनी हृद्याच्या बाबतीत जागरुक रहावे यासाठी 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृद्य दिन म्हणून पाळला जातो.

हृद्याच्या कार्यात बिघाड झाल्यास अनेकविध विकार उत्पन्न होतात. हृद्रोगामुळे अकाली मृत्यु होण्याचा धोका वाढतो. यासाठी प्रत्येकाने हृद्याची काळजी घ्यावी. हृद्रोग होण्यामागच्या कारणांपासून उदा. व्यसनाधिनता, अयोग्य आहार – विहार, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली इत्यादींपासून परावृत्त व्हावे.

हृद्याचे आरोग्य कसे राखाल :
हृद्याचे आरोग्याच्या दृष्टिने महत्व विचारात घेता, हृद्याची काळजी कशी घ्यावी, हृद्य निरोगी कसे ठेवावे, हृद्यरोग होऊ नये म्हणून काय करावे याची माहिती येथे दिलेली आहे.
◦ हृद्याच्या आरोग्यासाठी आहार –
हलका, सुपाच्य आहार घ्यावा.योग्य प्रमाणातच आहार सेवन करावा.
आहारात हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, कोशिंबीर, बदाम, मणुका, मोड आलेली कडधान्ये, तंतूमय पदार्थ यांचा भरपूर समावेश करावा.
◦ चांगले स्निग्धपदार्थ –
आहारात मोनोअन्सॅच्युरेटेड मूफा आणि पॉलीअन्सॅच्युरेटेड पूफा फॅट्सचा समावेश करावा. यांदोहोंच्या सेवनाने शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते आणि शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते.
◦ हृद्याच्या आरोग्यासाठी विहार –
नियमित व्यायाम करावा. दररोज किमान तीस मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. विविध योगासणे करावित. प्राणायाम केल्याने शरीरात प्राणसंचार व्यवस्थित होतो.
◦ नियमित तज्ञांद्वारा आरोग्याची, हृद्याची तपासणी करुन घ्यावी. विशेषता रक्तातील नातलगांमध्ये जर हृद्यविकार उद्भवल्यास स्वतः विशेष दक्षता घेणे आवश्यक असते.
◦ मानसिक ताणतणाव रहित रहावे. राग, क्रोध, शोक, द्वेष, भय यासांरख्या भावनांवर नियंत्रण ठेवावे.

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.

हृद्याच्या आरोग्यासाठी टाळण्यायोग्य पदार्थ :
हृद्याच्या आरोग्यासाठी खालील आहार घटकांचे सेवन करणे टाळणे गरजेचे असते. यांमध्ये,
◦ सॅच्युरेटेड फॅट्स –
उदा. पामतेल, नारियल तेल, तूप, साय, लोणी, प्राणीज चरबी, अंड्यातील पिवळा बलक या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे अधिक प्रमाण असल्याने वरील पदार्थांचे प्रमाणातच सेवन करावे. यांच्या अतिसेवनाने वाईट कोलेस्टेरॉलमध्ये वाढ होते.
यांमुळे हृद्यविकार, उच्चरक्तदाब, धमनीकाठिन्यतः, स्थुलता, मधुमेह यासारखे विकार उत्पन्न होतात.
◦ ट्रांस फॅट्स किंवा कृत्रिम स्निग्धपदार्थांचे सेवन करु नये. उदा. डालडा सारख्या पदार्थात ट्रांस फॅट्सचे प्रमाण असते.
◦ हवाबंद पाकिटे, शीतपेये, विविध मिठाया, बेकरी पदार्थ यांपासून दूरच रहावे.
◦ साखर, मीठाचे अल्प प्रमाणातच सेवन करावे.
◦ तेलकट पदार्थ, आंबट पदार्थ, पचायला जड असणारा आहार यांचे सेवन करु नये.
◦ व्यसनाधिनता –
धुम्रपान, मद्यपान, तंबाखुसेवनाने हृद्यविकाराचा धोका अधिक पटीने वाढतो. यासाठी हृद्याच्या आरोग्यासाठी व्यसनांचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे.
◦ अतिव्यायाम, अतिश्रम करु नये.प्रतिक्रिया द्या :