कोणकोणत्या लक्षणांसह येतो हार्ट अटॅक

6161
views

कोणकोणत्या लक्षणांसह येतो हार्ट अटॅक :
छातीत वेदना सुरु होणे हे हार्ट अटॅकचे प्रमुख लक्षण आहे. त्या वेदनांना Angina (हृद्यशूल) असे म्हणतात.

हृद्यशूलाचे (Angina) स्वरुप –
छातीप्रदेशी दडपल्यासारखे वाटते, अत्यंत वेदनादायक पीडा होतात, बैचेनी जाणवते, छातीच्या मध्यभागापासून वेदनांची सुरवात होते. नंतर त्या वेदना मान, खांदा, हनुवटी, डावा हात यांपर्यंत पोहचतात.

हार्ट अटॅकची अन्य लक्षणे –
◦ अत्यधिक घाम येणे,
◦ बैचेन, अस्वस्थ होणे,
◦ अशक्तपणा जाणवणे,
◦ मळमळणे,
◦ छातीप्रदेशी जखडल्याप्रमाणे वाटणे,
◦ श्वासोच्छश्वासाचा वेग वाढणे ही लक्षणे हार्ट अटैकमध्ये जाणवतात.
हृद्यशूलाचे (Angina) प्रकार आणि हार्ट अटॅक –
हृद्यशुल (Angina) दोन प्रकारचे असतात.
Stable Angina –
अतिव्यायाम किंवा अति शारीरीक श्रमामुळे ह्या प्रकारातील Angina निर्माण होतात अशावेळी विश्रांती घेतल्यास हृद्यशुल कमी होतात.

Unstable Angina –
हृद्यशुलाचा हाच प्रकार धोकादायक असतो. यामुळेच हृद्यविकाराचा झटका येत असतो.
यामध्ये व्यायाम किंवा श्रमाशिवाय विश्रांती काळामध्ये हृद्यशुल निर्माण होतात.
अधिकांश व्यक्तिंमध्ये हृद्यशुलाचा हाच प्रकार आढळतो.
अशा वेदनांमध्ये विशेष वैद्यकिय दक्षता घेणे आवश्यक असते.

Heart attack symptoms in Marathiप्रतिक्रिया द्या :