हार्ट अटॅक (Heart Attack)

999
views

जाणून घ्या हार्ट अटॅकविषयी :
हार्ट अटॅक हा विकार हृद्यविकाराचा झटका येणे, हृद्यापघात या नावानेसुद्धा ओळखला जातो.
हार्ट अटॅकचे स्वरुप आज अंत्यंत चिंताजनक बनले आहे. कारण पूर्वी चाळीशीनंतर आढळणारा हार्ट अटॅक आज 25 ते 30 वयापुर्वीच युवकांमध्ये अधिक प्रमाणात आढळत आहे. बदललेली जीवनशैली, शारिरीक श्रमाचा अभाव, मानसिक तानतणाव या प्रमुख कारणांमुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत आहे. परीणामी अकाली मृत्युचेही प्रमाण वाढत आहे.

का येतो हार्ट अटॅक..?
जेंव्हा हृद्याच्या स्नायुंना [Heart Muscles] ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत होतो तेंव्हा हृद्याच्या स्नायुंमधील पेशी नष्ट होऊ लागतात तेंव्हा हार्ट अटॅक (हृद्यविकाराचा झटका) येतो.
कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. मात्र जेंव्हा काही कारणांमुळे ह्या धमनीद्वारे हृद्यास योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही तेंव्हा हृद्याच्या ठिकाणी वेदना होऊ लागतात. त्या वेदनांना Angina (हृद्यशुल) असे म्हणतात.

कोणास येऊ शकतो..?
हार्ट अटॅकचे संभाव्य धोक्याचे घटक –
◦ वयाच्या 25 वर्षानंतरच्या व्यक्ती,
◦ स्थुलता, मधुमेह, धमनीकाठिन्यता, उच्च रक्तदाब, मानसिक तणाव या विकारांनी पिडीत व्यक्ती,
◦ धुम्रपान, मद्यपान, तंबाखु, अमली पदार्थ इ. च्या व्यसनाधीन व्यक्तींमध्ये हृद्य विकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.

हार्ट अटॅकमुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
तसेच हार्ट अटॅक आल्याने उपद्रव स्वरुपात अनेक गंभीर विकार उद्भवतात.
यांमध्ये
◦ हृद्याचे अनेक विकार उद्भवणे,
◦ हृद्य निकामी होणे (हार्ट फेल्युअर),
◦ पक्षाघात येणे,
◦ किडन्या निकामी होणे यासारखे अनेक दुष्परिणाम हार्ट अटॅक मुळे होतात.
यासाठी वेळीच उच्चरक्तदाब, धमनीकाठीण्यता, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि स्थुलता या विकारांवर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. मानसिक ताणतणाव रहित रहावे. या उपायांचे अवलंब केल्यास हृद्यविकारापासून दूर राहता येते. जेणेकरुन हार्ट अटॅक येण्यापासून आपले रक्षण होईल. heart attack information in marathiप्रतिक्रिया द्या :