हार्ट अटॅकचे निदान कसे केले जाते

54
views

हार्ट अटॅकचे निदान कसे केले जाते :
रुग्णाचा इतिहास, शारीरीक तपासणीच्या आधारे हार्ट अटॅकचे निदान केले जाते. याशिवाय खालील महत्वाच्या वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक असते.

◦ इलेक्ट्रोकार्डीयोग्राम ECG किंवा EKG –
याद्वारे हृद्यासंबंधी विकृतीचे जवळजवळ 70% निदान होण्यास मदत होते.
◦ रक्त परिक्षण,
◦ कोलेस्टेरॉल चाचणी,
◦ रक्तदाब तपासणी,
◦ अँजिओग्राफी (Angiogram) – यांमुळे धमनीतील ब्लॉकेजची स्थिती कळण्यास मदत होते. यामध्ये Contrast agent कोरोनरी धमनींमध्ये सोडला जातो आणि विशेष एक्स-रेच्या सहाय्याने धमनींतील रक्तप्रवाह आणि ब्लॉकेजवर लक्ष ठेवले जाते.
Heart attack Diagnosis in Marathiप्रतिक्रिया द्या :