हार्ट अटॅकची कारणे

779
views

हार्ट अटॅकची कारणे :
बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, धकाधकीचे जीवन, मानसिक ताणतणाव आणि अयोग्य आहारामुळे आज हृद्यविकार 20 ते 25 वयामध्येसुद्धा आढळत आहे.

धमनीकाठीन्यता आणि हार्ट अटॅक –
धमनीकाठीन्यता हे हृद्यविकाराचे प्रमुख कारण आहे. धमनीकाठीन्यता या विकारात धमनींच्या आतील भिंतीभोवती फैटी फाईब्रस द्रव्याचा संचय होतो. फैटी फाईब्रस द्रव्याचा संचय झाल्याने कोरोनरी धमनी अरुंद बनते, त्यातील पोकळी कमी होते. त्यामुळे हृद्यास होणाऱया रक्तप्रवाहास आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यास बाधा निर्माण होते त्यामुळे ऑक्सिजन आणि रक्ताच्या कमतरतेमुळे हृद्याच्या स्नायुंमधील पेशी मृत होऊ लागतात तेंव्हा हार्ट अटॅक येतो.

हार्ट अटॅकला सहाय्यक ठरणारी अन्य कारणे –
◦ हृद्यविकारासंबंधी अनुवंशिक इतिहास असणे,
◦ मधुमेही रुग्ण असणे,
◦ उच्च रक्तदाबामुळे पीडीत असणे,
◦ रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असणे,
◦ स्थुलता,
◦ बैठी जीवनशैली,
◦ व्यायाम आणि शारीरिक श्रमाच्या अभावामुळे,
◦ मानसिक ताणतणावामुळे,
◦ अयोग्य आहाराचे सेवनाने, सैच्युरेटेड फॅट्सचा आहारतील अधिक सेवनाने, फास्ट-फूड, जंक-फूड, हवाबंद पाकीटे, शीतपेये यांच्या अतिरेकामुळे,
◦ हिरव्या पालेभाज्या, तंतूमय पदर्थांच्या आहारतील कमतरतेमुळे,
◦ धुम्रपान, मद्यपान, तंम्बाखु इ. व्यसन करणे ही कारणे हार्ट अटॅक येण्यास कारणीभूत ठरतात.

Heart attack causes in Marathiप्रतिक्रिया द्या :