गर्भावस्थेतील स्मार्ट टिप्स

747
views

गर्भावस्थेत स्वस्थ आणि सुरक्षीत राहण्याचे उपाय :
गर्भावस्थेची तयारी कशी करावी हा प्रश्न अनेक नवविवाहीत जोडप्यांचा प्रश्न असतो. योग्य आहार वैद्यकीय तपासण्या केल्या आणि गर्भाच्या वाढीला हानीकारक गोष्टी टाळल्या तर बाळाची वाढ योग्य होते.

गरोदरपणात बाळाची संपूर्ण वाढ ही आईच्या आरोग्यावर अवलंबून असते. त्यामुळे गरोदरपणात आई पूर्णपणे निरोगी असणे जरुरीचे आहे. यासाठी गरोदरपणात पूर्वीपासूनच आईच्या आहारात योग्य पोषकघटक असावीत. प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट जीवनसत्व यांचे योग्य प्रमाण असलेला आहार असावा. आईचे पोषण जर योग्य असेल तर बाळाची मानसिक तसेच शारीरिक वाढ उत्तम प्रकारे होते.

 

गर्भावस्थेतील स्मार्ट टिप्स :
गर्भावस्थेत स्वस्थ आणि सुरक्षीत राहण्याचे उपाय –

 • आपल्या डॉक्टरांशी चर्चा करणे – गर्भावस्थेतील आहार-विहार यासंबधी आपल्या काही शंका असतील तर त्या संदर्भात डॉक्टरांशी चर्चा करावी. त्यांनी केलेल्या सुचनांचे पालन करावे.
 • औषधे वेळेवर घ्यावित.
 • आहारासंबधी सूचनांचे पालन करावे. माता जो आहार घेते त्यातूनच बाळाचे पोषण होते त्यामुळे आहारावर विशेष लक्ष द्यावे.
  पोटात बाळ वाढत असताना त्याला पोषणाची गरज असते. म्हणूनच गरोदर बाईने नेहमीपेक्षा जास्त जेवले पाहिजे.
 • आहार वेळच्यावेळी सेवन करावा.
 • विहारासंबंधी सूचनांचे पालन करावे.
 • लांबचा प्रवास करणे टाळावे.
 • थकवा आणणारी कामे टाळावित.
 • अधिक कठिन व्यायाम करु नये.
 • पुरेसा आराम घ्यावा.
 • जागरण करु नये.
 • मानसिक ताण-तणावरहित राहावे.
 • नियमित तपासणी करुन घ्यावी.

या सूचनांचे पालन केल्यास माता आणि बाळ यां दोहोंचे आरोग्य सुरक्षीत होईल.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :