गाऊटचा त्रास (Gout)

2732
views

गाऊटचा त्रास :
गाऊट (Gout) हा विकार वातरक्त या नावाने सुद्धा ओळखला जातो. शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण सामान्यापेक्षा अधिक वाढल्याने गाऊट विकार होतो.
युरिक अॅसिड हे एक प्रकारचे विषारी घटक असून शरीरात Purines पासून तयार होते. सामान्यतः आपली किडनी ही शरीरातील या विषारी घटकास मूत्राबरोबर शरीरातून बाहेर टाकत असते.
मात्र कोणत्याही कारणामुळे किडनी ची कार्यक्षमता कमी झाल्याने हा विषारी घटक मूत्राबरोबर शरीरातून बाहेर न टाकला गेल्याने, रक्तामध्ये युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते आणि हा विषारी घटक छोट्या-छोट्या स्फटिक स्वरूपात आपल्या शरीरातील सांध्यांमध्ये (Joints) जमा होऊन त्याठिकाणी सूज, वेदना, जकड़न इत्यादि लक्षण उत्पन्न करतो.

गाऊटची लक्षणे :

 • गाऊट रोगात सांध्यांमध्ये युरिक अॅसिड जमा झाल्याने त्याठिकाणी सूज, वेदना, जकड़न यासारखी लक्षणे दिसतात.
 • रोग अधिक वाढल्यास रूग्णास चालण्यास-फिरण्यास त्रास होतो.
 • सांध्यांना केवळ स्पर्श केले तरी अत्यधिक पीड़ा होते. पीड़ित सांध्याची त्वचा लाल रंगाची दिसते. तर यामुळे कधी-कधी सांध्याचा आकारसुद्धा विकृत होतो.
 • हा रोग प्रामुख्याने पायाच्या अंगठ्यामध्ये अधिक प्रमाणात झालेला आढळतो. याशिवाय गुडघा, बोटे, कोपर, नितम्ब आणि पाठीच्या कण्यातील सांध्यांमध्येसुद्धा हा विकार होतो.

गाऊटचे निदान कधी होते..?
पुरुषांमध्ये रक्त तपासणीत युरिक अॅसिडची मात्रा 7.2 mg/dl पेक्षा अधिक असल्यास आणि महिलांमध्ये 6.1 mg/dl पेक्षा अधिक मात्रेत रक्तात युरिक अॅसिड असल्यास Hyperuricemia / Gout चे निदान होते.
याशिवाय मूत्र परिक्षण आणि सांध्यातील द्रव्याच्या परिक्षणामध्ये अधिक मात्रेत युरिक अॅसिड आढळल्यास Gout रोगाचे निदान होते.

गाऊट रोग होण्याची कारणे :

 • शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण सामान्यापेक्षा अधिक वाढल्याने गाऊट विकार होतो. महिलांपेक्षा हा रोग पुरुषांमध्ये अधिक आढळतो.
 • शरीरात युरिक अॅसिड वाढण्यास खालील घटक सहाय्यक ठरतात जसे,
  अतिमद्यपान, लठ्ठपणा, मांसाहाराचे अधिक सेवन केल्याने,
 • Aspirin आणि मूत्रल अौषधांच्या (Diuretics) अतिवापरामुळे,
 • अनुवांशिकता इत्यादि कारणांमुळे गाऊट रोग होऊ शकतो.
  याशिवाय कोणतीही मोठी शस्त्रक्रिया (Operation) झालेली असल्यास गाऊट रोग होण्याचा धोका जास्त असतो. तसेचं महिलांमध्ये रजोनिवृत्ति नंतर गाऊट रोग होण्याची अधिक शक्यता असते.

गाऊट रोगावर उपचार कसे करतात..?
वेदना आणि सूज कमी करण्यासाठी वेदनाशामक आैषधे दिली जातात. शिवाय रक्तातील युरिक अॅसिड ची मात्रा सामान्य
ठेवण्यासाठी विशेष आैषधे दिली जातात.
वजन नियंत्रण, व्यायाम आणि आहारासंबंधी मार्गदर्शन डॉक्टर करतात.
तर अत्याधिक पीड़ा आणि सुज असल्यास Uric acid चे स्फटिक काढण्यासाठी शस्त्रक्रिया (Operation) सुद्धा केली जाते.

आयुर्वेदिय उपचार :
गाऊट अर्थात वातरक्त ह्या विकारामध्ये आयुर्वेदिय उपचार विशेष गुणकारी आहेत.
गुळवेल (गुडूची), तालिमखाना या औषधी वनस्पतींचा गाऊट या वातरक्ताच्या आजारावर उपयोग होतो.

हे करा..

 • गाऊटमध्ये युरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवणारा आहार घेतला पाहिजे.
  यासाठी अधिक Potassium युक्त आहार घ्या. जसे केळी, दही, मका, बाजरी इत्यादि. अधिक Complex Protein युक्त आहार घ्या. जसे जांभूळ, ओवा इ.
 • मद्यपान, धुम्रपान करणे टाळा.
 • Purine युक्त आहार घेऊ नये. जसे मांसाहार, झींगा, कोबी, पालक, मटार, शीतपेये इ. आहार घेणे टाळा.
 • गाऊट एक प्रचंड पीड़ादायी असा रोग आहे. त्यामुळे त्याची लक्षणे जाणवू लागताचं डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

Gout causes, symptoms, Diagnosis, treatments in Marathi.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :