प्रथमोपचाराची पेटी

4433
views

प्रथमोपचार :
प्रथमोपचार म्हणजे एखाद्या आजारात किंवा जखम झाल्यास केलेले प्राथमिक उपचार. प्रथमोपचार हे सामान्यत: एखाद्या तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीद्वारे एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत विशिष्ट वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंतच्या काळात दिले जातात. सामान्यत: आढळणार्‍या इजा म्हणजे खाली पडणे, भाजणे, बुडणे व रस्त्यावरील अपघात.

प्रथमोपचाराबद्दल पूर्ण माहिती असणे हे सर्वसामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. दुर्घटना कधीही सांगून होत नाही. घरात किंवा घराबाहेर प्रत्येकाला या दुर्घटनेशी सामना करावा लागतो. अशा वेळी न घाबरता, डोकं शांत ठेवून झटपट उपचार करणं आवश्यक असतं. म्हणूनच तुमच्या घरात कायम प्रथमोपचाराचं सामान तयार ठेवा. जखम मोठी/गंभीर असल्यास प्रथमोपचार केल्यानंतरही लवकरात लवकर डॉक्टर गाठा.

प्रथमोपचाराची पेटी :
आपल्या घरात प्रथमोपचार पेटी कायमची असू दे. काही अपघात झाल्यास त्वरित उपचार करण्यासाठी ही पेटी तयार स्थितीत ठेवा. ही पेटी तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये तयार स्वरुपात मिळू शकते किंवा घरच्या घरी बनवणंही सहज शक्य आहे. या पेटीवर ठळक अक्षरात ‘र्फस्ट एड बॉक्स’ किंवा ‘प्रथमोपचार पेटी’ लिहून ती सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या.

 • छोटी कात्री, चिमटा, टॉर्च
 • डेटॉल/सॅव्हलॉन, अँटीसेप्टिक क्रीम
 • निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या, चिकटपट्टी
 • गुंडाळता येणारी बँडेजेस्
 • जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी
 • औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस
 • थर्मामीटर
 • पेट्रोलिअम जेली
 • साबण
 • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेता येणारी काही सर्वसामान्य औषधं
 • फॅमिली डॉक्टर, जवळच्या हॉस्पिटल आणि नातेवाइकांचे टेलिफोन नंबर
 • प्रथमोपचाराची पेटी नेहमी सर्वांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावी.
 • पेटीतील औषधे त्यांची मुदत संपताच त्वरीत बदलावी.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :