डोळ्यांच्या आरोग्यासाठी स्मार्ट टिप्स

7223
views

डोळ्यांच्या आरोग्यासाठी स्मार्ट टिप्स :
डोळ्यांचे स्थान आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे असते. यामुळे डोळ्यांची कार्यक्षमता, आरोग्य राखण्यास मदत होते.
◦ डोळ्यांवर ताण येऊ देऊ नये. यासाठी अधिक वेळापर्यंत TV, मोबाईल पाहू नये. संगणकावर सलग काम करु नये. मधून मधून थोडी विश्रांती घ्यावी. वाचण, शिवणकाम करताना डोळ्यांवर ताण येतो आहे असे वाटल्यास थोडा वेळ विश्रांती घ्यावी.
◦ अति प्रखर प्रकाशाकडे अधिक वेळ पाहू नये. सुर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये.
◦ पुरेशी झोप घ्यावी. रात्री जागरण करु नये. दिवसा झोपू नये.
◦ पित्तवर्धक आहार उदा. अतितिखट, खारट, उष्ण, मसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ अधिक खाऊ नयेत.
◦ अपुऱ्‍या प्रकाशात लिहिणे, वाचणे इ. गोष्टी करणे टाळावे.
◦ प्रवासामध्ये वाचू नये.
◦ प्रकर सुर्यप्रकाशात हिंडू नये, अनवाणी चालू नये.
◦ दिवसातून दोन वेळा गार पाण्याने डोळे स्वच्छ करावेत.
◦ रात्री झोपण्यापुर्वी पायांच्या तळव्यांना तेलाने अभ्यंग करुन काशाच्या वाटीने घासल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि डोळे निरोगी होतात.प्रतिक्रिया द्या :