व्यायाम महत्व

15121
views

व्यायाम म्हणजे काय ?
शरीराला स्थिरता प्राप्त करण्यासाठी, शरीर मजबुत बनवण्यासाठी, बल वाढवण्यासाठी केल्या जाणाऱया क्रियेस व्यायाम असे म्हणतात.

व्यायाम महत्व –
◦ व्यायामामुळे शारीरीक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमिना वाढतो,
◦ शरीर मजबूत होते, बलाची वाढ होते पर्यायाने रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते,
◦ शरीर आकर्षक, बांधेसुद बनते,
◦ व्यायामामुळे शरीरातील मेदाचे प्रमाण कमी होते त्यामुळे शरीराला हलकेपणा येतो. वजन आटोक्यात राहते, स्थुलता होत नाही,
◦ स्थुलतेमुळे होणाऱया गंभीर विकारांपासून दूर राहण्यास मदत होते. जसे हृद्रोग, उच्चरक्तदाब, मधुमेह, धमनीकाठिन्यता, संधिवात, पक्षाघात आणि विविध प्रकारचे कैन्सरपासून दूर राहण्यास नियमित व्यायामामुळे मदत होते,
◦ जाठराग्नी प्रदिप्त होतो, अन्नाचे योग्य पचन होते, मल, मुत्र आणि स्वेदाचे योग्य प्रकारे निसरण होते,
◦ व्यायामामुळे आळस नष्ट होतो,
◦ झोप व्यवस्थित लागते,
◦ मानसिक तणावापासून मुक्ति मिळते,
◦ शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. यासारखे विविध लाभ नियमित व्यायामामुळे होत असतात.

विविध व्यायाम प्रकारामुळे बर्न होणारी कैलरीज विषयी माहिती येथे दिलेली आहे.

व्यायाम प्रकार बर्न होणारी कैलरीज
चालण्याचा व्यायाम 1 मैल चालण्याच्या व्यायामामुळे शरीरातील जवळजवळ 100 कैलरीज वापरली जाते.
पळण्याचा व्यायाम 1 मैल पळण्याच्या व्यायामामुळे शरीरातील जवळजवळ 120 कैलरीज वापरली जाते.
पोहण्याचा व्यायाम 20 मिनिटे पोहण्याच्या व्यायामामुळे शरीरातील 100 कैलरीज उर्जा वापरली जाते.
सायकल चालवणे 20 मिनिटे सायकल चालवण्याच्या व्यायामामुळे शरीरातील 100 कैलरीज उर्जा वापरली जाते.
Aerobic व्यायाम 20 मिनिटे Aerobic व्यायाम केल्याने शरीरातील 100 कैलरीज उर्जा वापरली जाते.


प्रतिक्रिया द्या :