कसा असावा उन्हाळ्यातील आहार

1772
views

कसा असावा उन्हाळ्यातील आहार :
उन्हाळ्यामध्ये जाठराग्नि मंद असतो. त्यामुळे आहाराचे योग्य प्रकारे पचन होण्यासाठी पचणास हलका आहार घ्यावा. उन्हाळ्यात आहार कमी प्रमाणातच घ्यावा. तुप, तेल, ताक यांचा आहारात समावेश करावा

विविध पेये –
माठातील थंड पाणी, कोकम सरबत, लिंबू सरबत, शहाळाचे पाणी, विविध फळांचे रस, ताक, लस्सी, नाचण्याचे अंबिल इ. पेयांचे उन्हाळ्यामध्ये सेवन करणे हितकारक असते.

फळे –
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये द्राक्षे, टरबूज, कलिंगड, करवंदे, फणस, आंबे, डाळिंब यासारखी रसदार फळे खावीत.

पालेभाज्या व फळभाज्या –
उन्हाळ्यामध्ये पालेभाज्यांची टंचाई असते. आहारात विविध पालेभाज्यांचा समावेश अधिक असावा. काकडी, गाजर, बीट आणि कांद्याचे कोशिंबीर आहारात ठेवावे.

मसाला –
उन्हाळ्यामध्ये मसाल्यांचा वापर अत्यंत कमी प्रमाणातच करावा. मुळात मसाले हे उष्ण गुणाचे असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात मसाले अतिप्रमाणात वापरणे टाळावे.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

मांसाहार –
उन्हाळ्यामध्ये जाठराग्नि मंद असल्याने पचनास जड असणारे मांसाहारी पदार्थ अल्प प्रमाणामध्येच सेवन करणे हिताचे असते. मांसाहारामध्ये मसाल्यांचा अतिवापर करणे टाळावे.

उन्हाळ्यामध्ये दुध, दही, ताक, लस्सी, तुप यांचा वापर आहारामध्ये करावा.
सामान्य आहारातील भात, भाकरी यांचा समावेश अधिक असावा.
फ्रीजमधील अतिथंड पाणी पिणे टाळावे, आईस्क्रीम, विविध शीतपेये यांचा ठराविक प्रमाणामध्येच वापर करावा.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.