कसा असावा पावसाळ्यातील आहार


कसा असावा पावसाळ्यातील आहार :
पावसाळ्यामध्ये जाठराग्नी मंद झालेला असतो. अग्निमांद्य निर्माण झाल्याने अन्नाचे पचन योग्यप्रकारे होत नाही. पावसाळ्यामध्ये पचनास हलका असणारा आहार प्राधान्याने घ्यावा. अधिक प्रमाणात आहार घेणे टाळावे,
भूक वाढविणारा, अन्नाचे पचन करणारा आहार घ्यावा. यासाठी मिरे, हिंग, सुंठी, आले, लसून, जिरे, पिंपळी या दीपन-पाचन करणाऱया द्रव्यांचा आहारात समावेश करावा.

धान्ये व कडधान्ये –
धान्याच्या लाह्या खाव्यात. लाह्या पचनास हलक्या असतात. त्यामुळेच पावसाळ्यात येणाऱ्या नागपंचमीच्या सणाला लाह्या खाल्या जातात.
पचनास हलकी असणारी मूग डाळ पावसाळ्यामध्ये आहारात घ्यावी. मूग डाळीचे वरण हे भातामध्ये तूप घालून खावे.

पालेभाज्या –
पावसाळ्यामध्ये पालेभाज्या कमी प्रमाणात खाव्यात. पालेभाज्या, फळभाज्यांचा स्वच्छ करुनच आहारात उपोयोग करावा. भेंडी, कारले, पडवळ, दुधी भोपळा या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा.

फळे –
फळे खाताना फळे स्वच्छ करुनच खावीत. जास्त पिकलेली फळे खाऊ नयेत.

स्निग्ध पदार्थ –
पावसाळ्यामध्ये तूपाचा आहारात समावेश करणे चांगले असते. पावसाळ्यात वातदोषाचा प्रकोप होत असतो तर पित्ताचा संचय होत असतो. तुपामुळे पित्त, वात कमी होत असते तसेच तुपामुळे अग्निवर्धनसुद्धा होते.
तळलेले पदार्थ पचण्यास जड असतात, पित्त वाढवत असल्याने तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
पावसाळ्यात दही खाऊ नये, ब्रेड खाऊ नये.

पाणी –
पावसाळ्यामध्ये पाणी दुषित झालेले असते. अशावेळी पाणी गाळून, उकळवूण, स्वच्छ करुणच प्यावे किंवा आहारामध्ये वापरावे. अस्वच्छ पाणी पिण्यामुळे पावसाळ्यात अनेक साथीचे रोग होत असतात.

पावसाळ्यातील आहार Smart tips –
◦ पावसाळ्यामध्ये हलका, ताजा, गरम आहार घ्यावा,
◦ पचनास जड आहार घेऊ नये.
◦ बाहेरचे, उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.
◦ पाणी गाळून, उकळवूण, स्वच्छ करुणच प्यावे.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :