किती प्रकारचा असतो मधुमेह

714
views

किती प्रकारचा असतो मधुमेह..?
मधुमेहाचे तीन मुख्य प्रकार आहेत.
◦ Type 1 Diabetes
◦ Type 2 Diabetes
◦ Gestational diabetes

Type 1 Diabetes –
या प्रकारचे मधुमेही रुग्ण हे पुर्णपणे इन्सुलिन इंजेक्शनवर अवलंबुन असतात. म्हणून या प्रकारास Insulin Dependent Diabetes Mellitus [IDDM] असे म्हणतात.
या प्रकारातील रुग्णांच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत नाही यासाठी बाहेरुन इन्सुलिन इंजेक्शनाद्वारे इन्सुलिनची गरज भागवली जाते. ह्या प्रकारातील रुग्ण मधुमेहापासून पुर्णपणे बरे होत नाहीत. रक्तातील साखर नियंत्रणात राखण्यासाठी त्यांना दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते.
मधुमेहाचा हा प्रकार स्थायी आणि गंभीर स्वरुपाचा असतो.

Type 2 Diabetes –
ह्या प्रकारास “मधुमेह पुर्व अवस्था” [Pre-diabetes] असेही म्हणतात. या अवस्थेमध्ये जर रुग्णाने योग्य आहार, विहार, व्यायाम आणि योग्य उपचाराचा अवलंब केल्यास टाईप 1 प्रकारचा मधुमेह होण्यापासून रुग्ण स्वतःला वाचवू शकतो.
तर अयोग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास, मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्यास टाईप 1 प्रकारचा कायमस्वरुपी मधुमेह जडतो.
टाईप 2 प्रकारचेच रुग्ण अधिक असतात.
वयस्कामध्ये अधिक आढळतो. प्रामुख्याने अतिस्थुलतेमुळे इन्सुलिन निर्मितीवर परिणाम झाल्याने हा प्रकार होतो. म्हणून या प्रकारास Non-Insulin Dependent Diabetes Mellitus [NIDDM] असे म्हणतात.

Gestational diabetes –
गर्भिणी स्त्रीयांमध्ये ह्या प्रकारचा मधुमेह होतो.
विशेषतः 9 पाउंड पेक्षा अधिक वजनाच्या बाळास जन्म देणाऱया स्त्रियांमध्ये ह्या प्रकारचा मधुमेह होण्याची अधिक शक्यता असते.प्रतिक्रिया द्या :