मधुमेहावर कोणकोणते उपचार उपलब्द आहेत

620
views

मधुमेह उपचार मार्गदर्शन :
मधुमेहाच्या प्रकारावर उपचार अवलंबुन असतात.
टाईप 1 मधुमेही रुग्णांना दररोज इन्सुलिन इंजेक्शनची गरज असते.

टाईप 2 मधुमेह आणि उपचार –
योग्य आहार, विहार, व्यायाम आणि औषधांमुळे टाईप 2 मधुमेह नियंत्रणात येतो. यासाठी,
◦ वजन आटोक्यात ठेवावे,
◦ नियमित व्यायाम करावा,
◦ डॉक्टरांनी सुचवलेला आहार वेळच्या वेळी घ्यावा,
◦ औषधे वेळच्या वेळी घ्यावीत,
◦ नियमित ब्लड शुगरची तपासणी करुन घ्यावी,

उपचाराचे 4 प्रमुख उद्देश –
◦ रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे,
◦ डायबिटीजच्या दुष्परिणामापासून बचाव करणे,
◦ वजन आटोक्यात ठेवणे,
◦ उच्चरक्तदाब, हृद्यविकार यासारखे विकार होऊ न देणे यासाठी कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणे.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :