मधुमेह (Diabetes)

1344
views

जाणून घ्या मधुमेहाविषयी :
मधुमेहामध्ये रक्तातील ग्लुकोज (साखरेची) मात्रा वाढते. तसेच इन्सुलिन नामक स्त्रावाची उत्पत्ती कमी होते आणि याविकारात कार्य करण्यासाठी शरीराला लागणाऱ्‍या उर्जेचे रुपांतर करणे अवघड बनते.

स्वादुपिंड [Pancreas] ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही. यामुळे रक्तामधील साखरेची मात्रा वाढते.

शरीरातील उर्जेचा प्रमुख स्त्रोत हा ग्लुकोज आहे. यामुळेच शरीराला उर्जा मिळते, शरीराची झीज भरुन काढली जाते तसेच शरीरास कार्य करण्यास या उर्जेमुळेच मदत होते. मात्र मधुमेहामध्ये ग्लुकोजचे योग्य पचन होत न झाल्याने, कोणत्याही परिवर्तनाशिवाय साखर मुत्रावाटे बाहेर टाकली जाते. यामुळे मधुमेहामध्ये ग्लुकोजचे उर्जेमध्ये रुपांतर होत नाही. आहारातील कर्बोदकांचे व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक अशी उर्जा मिळत नाही.

इन्सुलिन [Insulin] –
स्वादुपिंडातून इन्सुलिनची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे प्रमुख कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते.

इन्सुलिनचे कार्य कसे घडते –
स्वादुपिंडातून इन्सुलिनची निर्मिती झाल्यानंतर ते इन्सुलिन रक्त प्रवाहामध्ये जाते. तेथे जाऊन रक्त प्रवाहामधील साखरेला शरीरातील लाखो पेशींपर्यंत पोहचवत असतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे पचन होते. रक्तातील साखरेचे पचन झाल्याने शरीराला उर्जा तर मिळतेच शिवाय रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जाते. म्हणून शरीरामध्ये इन्सुलिनचे अत्यंत महत्व आहे.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

मधुमेहामध्ये शरीरात काय काय घडते?
◦ स्वादुपिंडातून इन्सुलिनची उत्पत्ती कमी होते.
◦ रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही.
◦ रक्तामधील साखरेची मात्रा वाढते.
◦ पचनसंस्था बिघडते. साखरेचे, कर्बोदकांचे शरीरात व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळत नाही.
◦ वाढलेली साखर कोणत्याही कार्याशिवाय मुत्रातून बाहेर टाकली जात असते.प्रतिक्रिया द्या :