कोणकोणत्या कारणांमुळे होतो मधुमेह

751
views

कोणकोणत्या कारणांमुळे होतो मधुमेह..?
टाईप 1 मधुमेहाची कारणे –
टाईप 1 डायबिटीज हा प्रामुख्याने प्रतिकारक क्षमतेच्या विकृतीमुळे होतो.

टाईप 2 मधुमेहाची कारणे –
इन्सुलिन स्त्राव निर्मितीवर परिणाम झाल्याने आणि शरीराद्वारे शर्करा न वापरल्यामुळे हा प्रकार उद्भवतो.
इन्सुलिन स्त्राव निर्मितीवर परिणाम कारणारे घटक –
◦ अतिस्थुलता – टाईप 2 मधुमेहाचे प्रमुख कारण हे अतिस्थुलता हेच आहे. आज वयस्कामध्ये तसेच मुलांमधील स्थुलतेमुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे.
◦ अयोग्य आहाराचे सेवन केल्यामुळे. मधुमेहींसाठी योग्य अयोग्य आहार कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
◦ व्यायामाच्या अभावामुळे,
◦ बैठी जीवनशैली,
◦ अत्यधिक ताणतणाव,
◦ उच्च रक्तदाब यांमुळे इन्सुलिन निर्मितीवर परिणाम होतो.प्रतिक्रिया द्या :