कोलेस्टेरॉल चाचणी विषयी जाणून घ्या

233
views

कोलेस्टेरॉल चाचणी :
कोलेस्टेरॉल चाचणीद्वारे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण तपासले जाते. विविध हृद्यासंबंधी विकारांमध्ये कोलेस्टेरॉलची तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते.

कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा एक मेणासारखा पदार्थ असून शरीराच्या सामान्य क्रियेसाठी ठराविक प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते. तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असणे हृद्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते.

कोलेस्टेरॉलचे प्रकार :
कोलेस्टेरॉलचे चांगला (HDL कोलेस्टेरॉल) आणि वाईट (LDL कोलेस्टेरॉल) असे दोन प्रकार आहेत.

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.

HDL कोलेस्टेरॉल –
High Density Lipporotein
हा कोलेस्टेरॉलचा प्रकार हृद्याच्या आरोग्यासाठी हितकारी असतो.
याला सामान्य भाषेत Good Cholesterol असेही म्हणतात.
हृद्याच्या उत्तम आरोग्यासाठी HDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण 50 ते 60 mg/dL पेक्षा जास्त असावे लागते.

LDL कोलेस्टेरॉल –
Low Density Lipoprotein
हा कोलेस्टेरॉलचा प्रकार हृद्यासाठी अत्यंत घातक असतो.
याला Bad Cholesterol असेही म्हणतात.
LDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण 100 mg/dL पेक्षा जास्त असल्यास हृद्यविकाराचा धोका निर्माण होतो.

कोलेस्टेरॉलची चाचणी कोणी करुन घ्यावी :
उच्चरक्तदाब, स्थुलता, मधुमेह ह्या विकारांनी पीडीत रुग्णांनी नियमित कोलेस्टेरॉलची तपासणी करुन घ्यावी.
वयाच्या 20 वर्षानंतर प्रत्येकाने दर पाच वर्षातून एकदा कोलेस्टेरॉलची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.



प्रतिक्रिया द्या :