कोलेस्टेरॉलचे प्रमाण किती असावे

3048
views

कोलेस्टेरॉलचे प्रमाण किती असावे :
HDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण किती असावे –
HDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण 40 mg/dL पेक्षा कमी असल्यास हृद्यविकार उद्भवण्याची अधिक शक्यता असते.
तर HDL चे प्रमाण 60 mg/dL पेक्षा अधिक असल्यास हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

LDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण किती असावे –
LDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण 100 mg/dL पेक्षा कमी असणे हृद्याच्या आरोग्यासाठी उत्तम असते.

LDL प्रमाण आणि स्थिती –
योग्य प्रमाण 100 mg/dL पेक्षा कमी
मध्यम प्रमाण 100 ते 129 mg/dL पर्यंत
काठावरील उच्च 130 ते 159 mg/dL पर्यंत
उच्च प्रमाण 160 ते 189 mg/dL पर्यंत
अतिउच्च प्रमाण 190 mg/dL पेक्षा अधिक असणे

कोलेस्टेरॉल असामान्यपणे कमी होण्याची कारणे :
◦ थॉयरॉईडच्या अतिक्रियाशील असल्याने (Hyperthyroidism),
◦ यकृताचे विकार,
◦ कुपोषण, पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे,
◦ कोलेस्टेरॉलचे प्रमाण असामान्यपणे कमी होते. कोलेस्टेरॉल प्रमाणापेक्षा कमी असणे हे सुद्धा आरोग्यासाठी धोकादायक असते.
कोलेस्टेरॉल असामान्यपणे वाढण्याची कारणे –
◦ विविध विकारांमुळे कोलेस्टेरॉलच्या प्रमाणात असामान्यपणे वाढ होते. यांमध्ये धमनीकाठिन्यता, Hypothyroidism थॉयरॉईड अक्रियाशील असणे, पित्ताशयाचा सिरोसिस, किडनींचे विकार
◦ हृद्याचे विविध विकारंमुळे, Heart attacks मुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण असामान्यपणे वाढते.
◦ अधिक सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रांसफॅट्सच्या सेवनामुळे कोलेस्टेरॉलच्या पातळीत वाढ होते.
◦ अनुवंशिक कारकांमुळे,
◦ मानसिक ताणतणावामुळे,
◦ अतिस्थुलता,
◦ व्यायामाचा अभाव,
◦ तसेच अनियंत्रित मधुमेहामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची असामान्यपणे वाढ होते.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :