कांजिण्याविषयी जाणून घ्या

5851
views

कांजिण्या (Chicken pox) :
बालकांना होणारा हा एक संसर्गजन्य असा व्याधी असून, यामध्ये प्रथमतः 1-2 दिवस ताप येऊन नंतर प्राधान्याने पायावर, पोटावर, पाठीवर पाण्यासारखा स्त्राव असणाऱ्या फोड्या उत्पन्न होतात. त्या फोड्या फुटल्यानंतर त्वचेवर काही दिवस काळसर डाग राहतो. हा विकार प्रामुख्याने शीत तसेच वसंत ऋतु मध्ये अधिकतेने होतो.
तर वयाचा विचार केल्यास 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकामध्ये होण्याची अधिक शक्यता असते. मुलांना लहान वयात कांजण्या आल्या नसतील तर मोठेपणी कांजण्या येण्याची शक्यता असते .

रोग कारण –
Varicella zoster नामक विषाणूंमुळे कांजिण्या उत्पन्न होतो.

रोग प्रसार –
या रोगाचा प्रसार बाधीत बालकाच्या फोड्यांपासून, दुषित वस्त्रांपासून तसेच विषाणु दुषित हवेमधून होत असतो. या रोगाचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट संसर्ग होऊ शकतो . नाकातून व घशातून उत्सर्जित होणाऱ्या हवेचा दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क आला की कांजण्यांची लागण होते .

संचय काळ –
कांजण्याचा कालावधी 7 ते 21 दिवसापर्यंत असतो .

रोगक्षमता –
एकदा कांजिण्या रोग झाल्यास त्या व्यक्तीमध्ये रोगक्षमता उत्पन्न होते. त्यामुळे एकदा कांजिण्या रोग झाल्यास जीवनात पुन्हा कधीही हा रोग उत्पन्न होत नाही.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

रोग लक्षणे –
◦ ताप येतो (101 ते 102 F)
◦ शरीरावर फोड येऊ लागतात,
◦ अंगदुखणे, खाज सुटणे, खोकला, सर्दि येणे या सारखी लक्षणे आढळतात.

प्रतिबंधात्मक उपाय –
जन्मापासून 13 वर्षांपर्यंत कधीही कांजण्या न झालेल्या व्यक्तीस अति तीव्र स्वरूपात कांजण्या होऊ नयेत , म्हणून लसीकरणाचा सल्ला देण्यात येतो .प्रतिक्रिया द्या :