जखम होणे, रक्तप्रवाह होणे

14
views

जखम लहान असू दे किंवा मोठी; त्यातून रक्त येण्याची दुर्घटना सर्रास घडतात. जखम झाल्यामुळे त्वचा फाटून रक्तप्रवाह होतो. काही वेळेस जखम मोठी असल्यास रक्त भळाभळा वाहतं.

  • जखमेतून खूप रक्तप्रवाह होत असल्यास, मुका मार लागला असल्यास किंवा जखमेची इतर काही लक्षणं दिसत असल्यास ड्रेसिंग पॅड वापरा किंवा जखमेवर हात घट्ट दाबून ठेवा.
  • रक्त वहाणं कमी झाल्यावर जखमेला ड्रेसिंग करा. बँडेज साधारण घट्ट बांधा.
  • जर रक्त येत असेल तर त्यावर जंतुसंसर्गा पासुन वाचविण्यासाठी पट्टी लावा.
  • त्या भागाला साबण लावुन कोमट पाण्याने धुवा, जर काही धुळ असेल तर धुवुन टाका.
  • जखमी झालेला अवयव वर उचलून धरा जेणेकरून रक्तप्रवाह कमी होईल. रक्त थांबे पर्यंत जख्मेवर दाबुन धरा. त्यावर पट्टी लावा.
  • जर कापलेली जखम खोल असेल, तर त्वरीत डाँक्टर कडे जा.
  • जखमी व्यक्तीला ताबडतोब डॉक्टरांची मदत मिळवून द्या.


प्रतिक्रिया द्या :