दमा म्हणजे काय – Asthma) :

दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छश्वासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय (Wheezing sound) असा आवाज योतो.

अस्थमाची लक्षणे (Asthma symptoms) :

  • खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.
  • ‎खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही.
  • ‎श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.
  • ‎दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.

दम्याचा झटका येणे किंवा अस्थमाचा अटॅक येणे म्हणजे काय..?

दम्याच्या रुग्णांना वरचेवर दम्याचा झटका येत असतात त्याला अस्थमा अटॅक (Asthma attack) असेही म्हणतात. अनेकदा दमा रुग्णास धुळ, धुर, परागकण, केसाळ पाळीव प्राणी, दमट हवामान, प्रखर सुर्यकिरण, कचरा, हवेतील प्रदूषित कण व मानसिक ताणामुळेही अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. अस्थमाचा अटॅक काही मिनिटांपासून ते काही तासापर्यंत राहू शकतो.

अस्थमा होण्याची कारणे (Asthma causes) :

शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीमधील विकृती ही दमा रोगास प्रमुख कारण असते.
खालिल कारणे ही दमा रुग्णांमध्ये अस्थमा अटॅक निर्माण होण्यास सहाय्यक ठरतात.

  • ढगाळ वातावरण, हिवाळा व पावसाळा ह्या सारख्या आद्र वातावरणामुळे अस्थमा अटॅक येतो,
  • ‎धुळ, धुर, धुके, माती, कचरा, बारीक तंतू, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, पेंट्स, उग्र वास असणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे अस्थमा अटॅक येतो,
  • ‎सिगरेट किंवा इतर प्रकारचा धूरामुळे,
  • ‎शारीरीक अतिश्रमामुळे, अतिव्यायामामुळे,
  • ‎हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे,
  • ‎वायु प्रदुषणामुळे,
  • ‎ताप, फ्लू, घसा सुजणे, ब्राँकायटिस, खोकला यासारखे रोग उत्पन्न झाल्याने,
  • ‎मानसिक ताणतणावामुळे अस्थमा रुग्णांना अस्थमाचा अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.

दम्याविषयी गैरसमज नको..!

  • अस्थमा हा आजार संसर्गजन्य नाही. म्हणजे अस्थमा व्यक्तीची दुसऱ्यास लागण होत नाही.
  • ‎अस्थमा कोणालाही होऊ शकतो. 
  • ‎अस्थमाकडे दुर्लक्ष करने जीवाला धोकादायक ठरू शकते, कधी कधी मृत्यूही ओढावू शकतो.
  • ‎दम्यावर नियंत्रण मिळवता येते. योग्य आहार, नियमित व्यायाम, योग्य औषधोपचार केल्यास आणि अस्थमा अटॅक आणणाऱ्या कारणांपासून दूर राहिल्यास दम्यावर नियंत्रण मिळवता येते.
  • ‎अस्थमा इन्हेलर वापरल्याने कोणतेही अपाय होत नाहीत. 

दम्याचे निदान कसे करतात..?

रुग्ण इतिहास, व्यक्त लक्षणे, शारीरीक तपासणीद्वारे अस्थमाच्या निदानास सुरवात केली जाते.
रुग्णाच्या परिवारामध्ये अन्य कोणास दमा आहे का, रुग्णास एलर्जिक रोग झालेला आहे का हे विचारले जाते.

अस्थमा निदानासाठी आवश्यक वैद्यकिय चाचण्या –

  • लंग फंक्शन टेस्ट – आपले डॉक्टर आपल्या फुफ्फुसांच्या कार्याची तपासणी करण्यासाठी स्पायरोमेट्री नावाची चाचणी करतील.
  • ‎याशिवाय छातीचा एक्स-रे परिक्षण केला जातो, ईसीजी (इलेक्ट्रोकार्डिओग्राम) केले जाते.
  • ‎स्टेथिस्कोपद्वारे तपासणी – श्वासोच्छश्वासावेळी सीटी वाजवल्यासारखा आवाज येणे.
  • ‎कोणत्या घटकाची अलर्जी आहे ते तपासण्यासाठी अलर्जी टेस्ट केली जाईल.
  • ‎श्वसन वाहिन्यांची संवेदनशीलता तपासण्यासाठी ब्रोंको प्रोवोकेशन टेस्ट केली जाईल.

दम्याचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावची काळजी :

दमा रोग उपचारांद्वारे पूर्णपणे बरा होत नाही मात्र दम्याची लक्षणे उद्भवू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येणे शक्य आहे. त्यामुळे दमा रुग्णांना वरचेवर येणारे अस्थमा अटॅक काही अंशी थांबवता येतील.
अस्थमापासून कायमस्वरूपी सुटका मिळवणे शक्य नसले तरीही विशेष काळजी घेतल्यास दम्यासोबतही जीवन आनंदाने जगणे शक्य होते. अस्थमाचा अटॅक येऊ नये यासाठी करावयाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

  • योग्य आहार, विहार आणि औषधोपचाराद्वारे दम्याच्या अटॅकपासून दूर राहता येते,
  • ‎दम्याचा पहिला दौरा आल्यानंतर भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून सतर्क रहावे,
  • ‎धुम्रपान करु नये,
  • ‎मानसिक ताणतनाव रहित रहावे,
  • ‎धुळ, धूर, हवेच्या प्रदुषणापासून दूर रहावे,
  • ‎दमा रुग्णांनी घरात पाळीव प्राणी पाळू नयेत,
  • ‎पावसाळा आणि हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी,
  • ‎प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे,
  • ‎थंड पदार्थ खाऊ नये, थंड पाणी घेऊ नये,
  • ‎मोकळ्या हवेत फिरावयास जावे,
  • ‎विटामिन A आणि D युक्त आहार घ्यावा, बदाम, हिरव्या पालेभाज्या आहारात असाव्यात.
  • ‎डॉक्टरांनी दिलेले इनहेलर्स वापरावे.

दमा उपचार माहिती (Asthma treatments) :

इनहेलर थेरपी – इनहेलरच्या योग्य प्रकारे वापराने अस्थम्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होते. रिलिव्हर्स आणि प्रीव्हेण्टर्स अशी अस्थमाची दोन्ही प्रकारची औषधे इनहेलरमार्फत देता येतात. आपल्या डॉक्टरांनी दिलेले इनहेलर्स वापरावे. अस्थमामध्ये उपचाराकरिता इनहेलरवाटे औषधे घेणे पूर्णपणे सुरक्षित आहे. इनहेलरवाटे दिली जाणारी औषधे ही श्वासावाटे थेट फुफ्फुसामध्ये जातात ती रक्तामध्ये मिसळत नाहीत. त्यामुळे शरीरावर त्या औषधांचा दुष्पपरिणाम होत नाही.

हे सुद्धा वाचा..

Read Marathi language article about Asthma causes, symptoms and treatment. Last Medically Reviewed on February 19, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.