नैसर्गिक प्रसूती होणे अशक्य असल्यास डॉक्टर काय करतात..?


नैसर्गिक प्रसूती होणे अशक्य किंवा अवघड बनल्यास आपले डॉक्टर खालील तीन पर्याय वापरून प्रसूतीची प्रक्रिया पुर्ण करतात.
1) बाळंतपणाच्या वेळी चिमटा लावणे
2) व्ह्याकुम/ व्हेन्टोज डिलीव्हरी
3) सिझेरियन पद्धत वापरणे
 

1) बाळंतपणाच्या वेळी चिमटा लावणे (फोर्सेप्स लावणे) :
बाळंतपण जर लांबत चालले आणि त्यात अडचण यायला लागली तर चिमट्याचा उपयोग केला जातो. बाळ बाहेर यायला उशीर लागला तर बाळ आणि मातेच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी आपले डॉक्टर Forcep म्हणजे चिमटाच्या सहाय्याने बाळाचे डोके घट्ट धरून त्याला बाहेर काढतात.
चिमटा लावताना भूल दयावी लागते तसेचं बाळाचे गर्भाशय फिरणे याचा अचूक अंदाज घेऊन त्याच्या तोंडावर, डोक्यावर कुठेही इजा होणार नाही अशाप्रकारे चिमट्यात त्याला पकडावे लागते.
कित्येक वेळा चिमटाच्या खुणा बाळाच्या डोक्याला तशाच रहातात. पण काही दिवसात निघून जातात. चिमट्यामुळे जर बाळाला इजा झाल्यास त्याची बौद्धीक वाढ खुंटणे, डोळ्यांना इजा होणे, बहिरेपणा येणे अशाही समस्या होण्याची शक्यता असते. म्हणून हल्ली डॉक्टर forcep चा वापर कमी प्रमाणात करतात.

 

2) व्ह्याकुम (Vacuum extraction) डिलीव्हरी :
प्रसुतीला वेळ लागत असल्यास कळा नीट येत नसल्यास तसेच बाळाला बाहेर ढकलतांना माता थकून गेल्यास Vacuum चा वापर करतात.
यामध्ये शंखाकृती तबकडी असते. ते बाळाच्या डोक्यावर ठेऊन त्यात हवेची पोकळी निर्माण केली जाते व हवेच्या दाबाने ठरावीक ओढ देऊन बाळाला बाहेर काढले जाते. यामध्येही बाळाच्या टाळूला इजा होणे, मेंदुमध्ये रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

 

3) सिझेरियन :
सिझेरियन म्हणजे योनीमार्गातून बाळ बाहेर न आणता ओटीपोटावर छेद देऊन ऑपरेशनद्वारे बाळ पोटावरून बाहेर काढणे. ओटीपोटाला एक छोटीशी आडवी चीर देऊन गर्भाशयापर्यंत पोहचून प्रथम बाळ बाहेर काढले जाते. नंतर वार काढली जाते. गर्भाशय रिकामे केले जाते व सर्व भाग परत शिवला जातो. ऑपरेशनआधी मातेला भूल दिली जाते.

ऑपरेशननंतर घ्यायची काळजी –
शस्त्रक्रियेनंतर पहिले 24 तास वेदना होत असल्यामुळे झोपेची व वेदना कमी करणारी औषधे देवून वेदना कमी केल्या जातात. दुसऱ्या दिवशी स्त्री उठून बसू शकते, उभे राहता येते, चालता येते, तसेच बसून स्तनपानही करता येते. ऑपरेशननंतर साधारण 8-10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागते.

सिझेरियन केंव्हा करावे लागते..?

 • बाळंतपणात आईच्या किंवा बाळाच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची खात्री होणे.
 • ओटीपोटात मुलाचे थांबणे, मूल आडवेतिडवे किंवा पायाळू असल्यास.
 • बाळाचे डोके मोठे असून जन्ममार्ग लहान असल्यास.
 • बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुरफटली जाणे.
  जर वार ही गर्भाशयाच्या खालच्या भागात असल्यास (Placenta Previa).
 • ‘प्लॅसेंट प्रिव्हिया’ म्हणजे खालच्या भागात वार असल्यास ( नेहमी ती वरच्या भागात असते ) ती गर्भारपणाच्या शेवटच्या काळात सुटून रक्तस्त्राव होऊ लागतो. नैसर्गिकरित्या प्रसूती अशा प्रसंगी कठीण असते तेंव्हा सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागते.
 • पूर्वीच्या बाळंतपणात दोन वेळा सिझेरियनची शस्त्रक्रिया झालेली असल्यास.
 • मातेचे काही आजार- उदा. मधुमेह, हृद्यविकार, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर,ओटीपोटात मोठी गाठ, गरोदरपणात रक्तदाब खूपच जास्त असणे व त्यामुळे आकडी येणे इ. असल्यास.
 • मातेचे वय 30 पेक्षा जास्त असल्यास.
 • तसेचं नैसर्गिक प्रसूतीमध्ये अडचणी येऊन बाळाचे डोके ठरावीक वेगाने खाली सरकले नाही किंवा गर्भाशयाचे तोंड उघडायला वेळ लागला इ. समस्या अचानक येऊ शकतात. अशा वेळी नैसर्गिक प्रसूतीचा प्रयत्न सोडून देऊन सिझेरियन शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागतो.

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :