संधीवातात कोणकोणती लक्षणे जाणवतात

41
views

संधिवाताची लक्षणे :
संधिवाताच्या प्रकारानुसार रोगाच्या स्वरुपानुसार लक्षणे असतात.

संधिवातात प्रामुख्याने आढळणारी लक्षणे –
◦ सांधे दुखणे,
◦ सांध्यांवर सूज येणे,
◦ सांध्यांची हालचाल योग्य प्रकारे न होणे,
◦ सांधे जखडणे, अवघडणे. विशेषतः सकाळी झोपेतून उठल्यावर सांधे अवघडल्यासारखे होणे,
◦ सांधे अशक्त, दुर्बल होणे,
◦ सांधा बाहेरुन लाल होणे,
◦ सांध्यास स्पर्श केल्यास गरम लागणे, वेदना अधिक जाणवणे,
◦ सांध्यात पाणी होणे,
◦ खूप दिवसांचा संधिवात असला तर बोटे वाकडी होणे यासारखी लक्षणे संधिवातामध्ये प्रामुख्याने आढळतात.प्रतिक्रिया द्या :