संधिवाताविषयी जाणून घ्या


संधिवाताविषयी जाणून घ्या :
सांध्याच्या ठिकाणी शोथ किंवा सुज उत्पन्न होणे, सांधे दुखणे म्हणजे संधीवात.
संधीवात हा विकार Arthritis किंवा Joint inflammation या अन्य नावानेसुद्धा ओळखला जातो. सांध्याच्या ठिकाणी सुज आल्याने सांधे वेदनायुक्त, सुजयुक्त आणि अवघडलेले
असतात. सांध्यातील श्लेष्मल अस्तर (Synovial membrane) हे शोथयुक्त झालेले असते.

संधिवात आणि तरुण –
सांधे दुखणे, सांध्यांची हलचाल योग्य प्रकारे न होणे, चालताना, वाकताना, उठताना-बसताना त्रास होणे, जिना चढणे-उतरणे त्रासदायक होणे ही सर्व लक्षणे उतारवयी उत्पन्न होणारी लक्षणे आहेत मात्र बदलती जीवनशैलीमुळे आज तरुणांमध्ये सुद्धा सांधे दुखण्याचे प्रमाण वाढत आहे.

जागतिक संधिवात दिन –
संधिवाताचे दिवसेंदिवस वाढणारे प्रमाण पाहता संधिवाताविषयी माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी, त्यांना संधिवाताविषयी जागृत करण्यासाठी दरवर्षी 12 ऑक्टोबर हा दिवस WHO मार्फत जागतिक संधिवात दिन म्हणून ओळखला जातो.

संधिवाताचे अनेक प्रकार असून त्यांची वेगवेगळी कारणे असतात. संधिवाताच्या प्रकाराचे निदान करताना खालिल मुद्दे विचारात घ्यावे लागतात.
◦ सांध्यांची झीज झाल्याने संधीवात निर्माण झाला आहे का,
◦ सांध्यांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याने संधीवात निर्माण झाला आहे का,
◦ सांध्याला दुखापत झाल्याने सांधा दुखतो का,
◦ हाडांच्या फ्रॅक्चरमुळे सांधा दुखतो का,
◦ रक्तामध्ये युरिक एसिड चे प्रमाण वाढल्यामुळे Goutची स्थिती निर्माण झाल्याने सांधे दुखतात का,
◦ आमवात आहे की संधिवात आहे,
◦ मधुमेह, स्थुलता यासारख्या विकारांमुळे संधिवात झाला आहे का, अशा अनेक गोष्टींचा विचार करुन संधिवाताच्या प्रकाराचे निदान करुन योग्य उपचार योजावे लागतात.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :