संधीवाताचे निदान कसे केले जाते

432
views

संधिवात निदान :
रुग्णाचा इतिहास, लक्षणे, शारीरीक तपासणीद्वारे संधिवाताच्या निदानास सुरवात होते.
याशिवाय खालिल वैद्यकीय परीक्षणांचा आधार संधिवाताच्या योग्य निदानासाठी घ्यावा लागतो.
◦ सांध्यांचा एक्स-रे परक्षण,
◦ रक्त परिक्षण, यामध्ये CBC चाचणी केली जाते तसेच रक्तातील युरिक एसिडचे प्रमाण तपासले जाते,
◦ कधीकधी MRI scan सुद्धा संधिवाताच्या निदानासाठी करणे आवश्यक असते.

संधिवाताचे अनेक प्रकार असून त्यांची वेगवेगळी कारणे असतात. संधिवाताच्या प्रकाराचे निदान करताना खालिल मुद्दे विचारात घ्यावे लागतात.
◦ सांध्यांची झीज झाल्याने संधीवात निर्माण झाला आहे का,
◦ सांध्यांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याने संधीवात निर्माण झाला आहे का,
◦ सांध्याला दुखापत झाल्याने सांधा दुखतो का,
◦ हाडांच्या फ्रॅक्चरमुळे सांधा दुखतो का,
◦ रक्तामध्ये युरिक एसिड चे प्रमाण वाढल्यामुळे Goutची स्थिती निर्माण झाल्याने सांधे दुखतात का,
◦ आमवात आहे की संधिवात आहे,
◦ मधुमेह, स्थुलता यासारख्या विकारांमुळे संधिवात झाला आहे का, अशा अनेक गोष्टींचा विचार करुन संधिवाताच्या प्रकाराचे निदान करुन योग्य उपचार योजावे लागतात.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :