संधीवात कोणकोणत्या कारणांमुळे होतो

1366
views

संधीवाताची कारणे :
अनेक कारणांमुळे संधिवात उत्पन्न होतो.
◦ हाडांचे फ्रॅक्चर झाल्याने,
◦ सांधे त्यांच्या मुळ ठिकाणापासुन निसटल्यामुळे (Joint dislocation),
◦ सांध्याच्या ठिकाणी आघात झाल्याने,
◦ विशिष्ठ रोगांमुळे संधीवात उद्भवतो जसे, Gout, मधुमेह, स्थुलता, रोग प्रतिकारक क्षमतेचे विकार उद्भवल्यामुळे,
◦ सोरायसिस सारख्या त्वचा विकाराने पिडीत रुग्णामध्ये Psoriatic arthritis उत्पन्न होतो,
◦ अतिस्थुलतेमुळे,
◦ रजोनिवृत्तीमुळे,
◦ वात वाढवणारी आणि सांध्यांची झीज करणारी कारणे संधिवाताला सहाय्यक ठरतात,
◦ रुक्ष, थंड, कडू, तिखट, तुरट यासारख्या वातवर्धक पदार्थांच्या अतिसेवनामुळे,
◦ अतिप्रवास करणे, जागरण करणे,
◦ मानसिक ताणतणामुळे,
◦ घरात आई-वडील, भाऊ, बहीण यांना संधिवात असल्यास अनुवंशिकतेमुळे संधिवात होण्याचा धोका अधिक असतो.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :