अनीमियात कोणकोणती लक्षणे जाणवतात

860
views

अनीमिया लक्षणे :
◦ शरीर पांढरे पडणे, त्वचा पांढरी, निस्तेज होणे,
◦ चक्कर येणे,
◦ शारीरीक दुर्बलता, थकवा जाणवणे,
◦ छातीत धडधडणे,
◦ रुग्ण वारंवार श्वास घेऊ लागतो (Breathlessness)
◦ भूक मंदावणे,
◦ चेहरा, पाय, शरीरावर सुज आलेली आढळते,
◦ अल्प परिश्रमानेसुद्धा धाप लागणे,
◦ त्वचा, नखे निस्तेज रुक्ष होतात, नखे सहज तुटु लागतात, नखे चपटी होतात,
◦ छातीमध्ये वेदना जाणवणे ही लक्षणे अनीमिया मध्ये व्यक्त होतात.

अनीमियाचे निदान कसे करतात..?
रुग्ण इतिहास, व्यक्त लक्षणे, शारीरीक तपासणीद्वारे अनिमियाच्या निदानास सुरवात होते.

याशिवाय खालिल वैद्यकिय चाचण्यांचा अनीमियाच्या निदानासाठी आधार घ्यावा लागतो.
रक्त परिक्षण – CBC test यामध्ये,
◦ रक्तातील तांबड्या पेशींची RBC संख्या मोजली जाते,
◦ रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासले जाते,
◦ रक्तातील B12, फॉलिक एसिड, लोह यांचे प्रमाण तपासले जाते.
◦ अनीमियाच्या निदानासाठी कधीकधी मल-मूत्र परिक्षणसुद्धा करणे गरजेचे असते.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :