अनीमिया होऊ नये यासाठी घ्यावची काळजी


अनीमीया दुष्परिणाम :
अधिक काळापर्यंत अनीमियाची स्थिती राहिल्यास,
◦ शारीरीक दुर्बलता निर्माण होते,
◦ कार्य करण्याची क्षमता कमी होते,
◦ हृद्यावर अनिष्ट परिणाम होतात.

प्रतिबंधात्मक उपाय –
◦ पोषकतत्वयुक्त संतुलित आहार घ्यावा,
◦ विशेषता लोह, फॉलिक एसिड, जीवनसत्व ब12 ह्या पोषकतत्वांनी युक्त आहार घ्यावा,
◦ मद्यपान, धुम्रपान इ. व्यसनांचा त्याग करावा,
◦ गर्भावस्थेमध्ये अनीमिया उत्पन्न होऊ नये यासाठी डॉक्टरांनी दिलेली लोह आणि फॉलिक एसिडची औषधे वेळच्यावेळी घ्यावीत,
◦ मासिक पाळीमध्ये अधिक स्त्राव येत असल्यास स्त्रीरोग तज्ञांद्वारा उपचार करुन घ्यावेत.

अनीमिया उपचार मार्गदर्शन –
रक्ताल्पतेसाठी रुग्णास रक्त चढवले जाते,
ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.
शारीरीक दुर्बलता कमी करण्यासाठी उपचार योजले जातात.


गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :