अनीमिया सामान्य माहिती

148
views

अनीमिया, रक्ताल्पता :
अनीमिया हा विकार रक्ताल्पता, पांडूरोग (रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर पांढरे पडते), रक्तक्षीणता, अरक्तता या अन्य नावांनीसुद्धा ओळखला जातो. अनीमिया या विकारामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची (RBC) संख्या कमी होते. तसेच RBC मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.

हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला तांबड्या पेशींमार्फत शरीरातील उतींपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे कार्य करत असतो. मात्र कोणत्याही कारणाने RBCची संख्या कमी होते किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते तेंव्हा शरीरातील उतींपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही.
अनीमिया प्रकार आणि कारणे –
अनीमियाचे अनेक प्रकार असून ते अनेकविध कारणांनी होतात. जसे,

अनीमिया प्रकार कारणे –
– Iron deficiency Anemia –  रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अनीमिया
– Pernicious Anemia – विटामिन B12 च्या कमतरतेमुळे होणारा अनीमिया
– Megaloblastic Anemia – फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे होणारा अनीमिया
– Sickle cell diseases, Thalassemia – अनुवंशिक कारणांमुळे ह्यां प्रकारचा अनीमिया होतो

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.

अनीमियाची अन्य सहाय्यक कारणे –
◦ रक्तस्त्राव झाल्याने अनीमिया उद्भवू शकतो. प्रामुख्याने अपघात, शस्त्रक्रिया, विविध कैन्सर, अल्सर, मुळव्याध, मासिक पाळी यांमुळे होणाऱया रक्तस्त्रावामुळे अनीमिया उद्भवतो.
◦ विविध विकारांमध्ये अनीमिया हे लक्षण आढळते. जसे किडनी फेल्युअर, आमवात, संक्रामक TB, विविध कैन्सर, हायपोथायरॉडिजम, रोग प्रतिकारक क्षमतेचे विकारांमध्ये रक्ताल्पता अनीमिया हे लक्षण आढळते.
◦ भोजनातील लोह, विटामिन B12, फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे,
◦ योग्य वयापुर्वीच गर्भावस्था येणाऱया स्त्रियांमध्ये,
◦ मासिकस्त्रावावेळी अधिक रक्त स्त्राव झाल्याने महिलांमध्ये
◦ अतड्यांतील कृमींमुळे,
◦ रक्तस्त्रावयुक्त मुळव्यधीच्या विकारांनी पिडीत रुग्णांमध्ये अरक्तता उत्पन्न होते.प्रतिक्रिया द्या :