जाणून घ्या गुदद्वाराचे विविध विकारांविषयी

42
views

गुदद्वाराच्या ठिकाणी कुठलंही लक्षण जाणवलं, की मला आता मुळव्याध झाली आहे, अशीचं प्रत्येक रुग्णाची भावना असते. मात्र गुदद्वाराजवळ अनेक आजार होतात. यामध्ये फिशर, भगंदर, मलावष्टंभ (Constipation) आणि मूळव्याध असे अनेक आजार गुदभागाजवळ आणि गुदभागामध्य लोकांना मोठ्या प्रमाणात होत असतात. मात्र प्रश्न आहे तो या आजारांविषयी मोकळेपणाने बोलण्याचा आणि समाजात त्याबाबत जनजागृती करण्याचा. चला, तर जाणून घेऊया गुदभागाजवळ होणाऱ्या या रोगांविषयी..

मूळव्याध (Piles or Hemorrhoids) :
मूळव्याध यालाच ‘पाईल्स’ किंवा ‘हेमोरहोयडस्’ असेही संबोधले जाते. मूळव्याध हा आजार बैठे काम करणा-या लोकांमध्ये विशेष करून आढळतो. गुदद्वाराला मांसल गुच्छ जाणवतात. यात वेदना, आग, खाज, रक्तस्त्राव अशा प्रकारच्या लक्षणांना रोग्याला सामोरे जावे लागते. रुग्णांना खाली बसल्यानंतर त्रास होतो.

परिकर्तिका :
परिकर्तिका म्हणजे फिशर. यामध्ये गुदभागी भेगा पडतात. त्यामुळे कात्रीने कापल्याप्रमाणे तीव्र वेदना होत असतात. तीव्र वेदनांसह आग होणे आणि मलाबरोबर रक्त बाहेर पडणे असाही त्रास होतो.

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.

भगंदरामध्ये (Fistula) :
भगंदर म्हणजे फिस्टुला. यामध्ये गुदाच्या जवळ जखम होते. ही जखम सहसा लगेच बरी होत नाही. भगंदराची जखम चिघळते आणि बाहेरून जरी बरी झाली तरी ती आतमध्ये गुदाच्या आतल्या बाजूपर्यंत वाढत जाते. जखमेतून पुन्हा पुन्हा रक्‍त येणे, पू येणे वगैरे तक्रारी असतात.

गुदभ्रंश (Rectal Prolapse) :
रेक्‍टल प्रोलॅप्स हा त्रास जास्त करून लहान मुलांमध्ये आढळतो. मलप्रवृत्तीनंतर गुदद्वारातून मांसल भाग बाहेर येणे आणि नंतर तो आपोआप आत जाणे किंवा तसाच बाहेर राहणे असे याचे स्वरूप असते. यातही कुंथावे लागणे, शौचाला कडक होणे, गुदभागी वेदना, दाह होणे वगैरे लक्षणे यात असतात.

बद्धकोष्ठता (Constipation) :
बद्धकोष्ठता म्हणजेचं मलावष्टंभ किंवा कॉन्स्टीपेशन या आजाराचे मूळ म्हणजे घेतलेला आहार व्यवस्थितरीत्या पचन न होणे किंवा चुकीच्या पध्दतीने आहार घेणे, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवेळी खाणे, अवेळी झोपणे इत्यादी अनेक कारणे नैसर्गिकपणे, नियमित होणाऱ्या मलविसर्जनात अडथळा आणतात. यामुळे शौचास वेळेवर होत नाही, किंवा पोट साफ होत नाही, कधी कधी घट्ट शौचास होते आणि जोर देऊन शौचास झाल्याने मूळव्याधीसारख्या व्याधी जडण्याची शक्‍यता असते.



प्रतिक्रिया द्या :