एड्स विषयी जाणून घ्या

8723
views

Aids information in Marathi, AIDS chi Mahiti, Aids causes, HIV symptoms, HIV test, prevention in Marathi.

एड्स (AIDS) आणि HIV म्हणजे काय..?
एड्स हा एक गंभीर असा रोग असून यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते. म्हणून त्याला Acquired Immune Deficiency Syndrome (AIDS) असे म्हणतात.
रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्याने रुग्ण शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्याही दुर्बल बनतो. अशी व्यक्ती साधारण ताप, सर्दि, खोकला यासारखे विकारही सहन करु शकत नाही.
एडस् हा एक अत्यंत घातक असा संसर्गजन्य विकार असून तो HIV (ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस) पासून पसरत असतो. HIV व्हायरसची शरीरात लागण झाल्यापासून AIDS रोग होण्यासाठी 8 ते 10 वर्षांचा कालावधी लागतो.

एड्स होण्याची कारणे :
• एडस् रोग हा HIV विषाणूच्या (व्हायरसच्या) संसर्गामुळे होत असतो.
• ‎ज्या रुग्णाला एडस् रोग झाला आहे किंवा ज्याच्या शरीरात एडसचे विषाणू (HIV व्हायरस) आहेत पण अद्याप ज्याच्यामध्ये स्पष्ट लक्षणे उत्पन्न झाली नाहीत अशा HIV बाधीत व्यक्तींशी लैंगिक संबंध स्थापित केल्याने,
• ‎तसेच HIV बाधीत रक्त एकाद्यास चढवल्याने त्यास HIV ची लागण होत असते.
• ‎HIV संक्रमित सुई, सिरींज इंजेक्शनांमार्फत HIV ची लागण होत असते.
• ‎असुरक्षीत लैंगिक संबंध, कंडोम न वापरता अनेक जनांबरोबर सेक्स करणे, वेश्यागमन ह्या प्रवृत्तीमुळेही HIV ची लागण होत असते.
• ‎एचआयवी बाधित व्यक्तीचे रक्त, वीर्य, योनीतील स्त्राव याद्वारे HIV ची लागण होत असते.
• ‎एड्स बाधीत मातेकडून गर्भस्थ शिशुमध्ये HIV ची लागण होत असते.
• ‎अंगावर Tattoo गोंदवून घेताना दूषित सुया किंवा सलूनमध्ये दाढी करून घेताना, वस्ताऱ्यासाठीचे ब्लेड HIV संक्रमित असल्यासही HIV ची लागण होत असते.

एड्स ची लक्षणे :
• रोगप्रतिकार शक्ती कमी होणे,
• ‎वजन कमी होत जाणे,
• ‎एक महिन्यापेक्षा जास्त काळ कोरडा खोकला असणे,
• ‎अंगावरील त्वचेवर वारंवार खाज येणे,
• ‎तोंडात व घशात फोड होणे,
• ‎वारंवार ताप येणे,
• ‎थकवा, अशक्तपणा येणे,
• ‎शरीर खंगत जाणे,
• ‎लसीकाग्रंथी सुजणे,
• ‎एक महिन्यापेक्षा जास्त काळ सतत जुलाब, पातळ शौचास होणे,
• ‎मांसपेशी दुर्बल बनत जाणे,
• ‎बारीक ताप येणे,
• ‎रात्री अत्यधिक घाम येणे,
• ‎भुक मंदावणे ही लक्षणे आढळू शकतात.

निदान कसे करतात..?
HIV चे निदान करण्यासाठी रक्त तपासणी, HIV antigen test, CD4 count, ELISA test, Saliva test करण्यात येतात.

प्रतिबंधात्मक उपाय :
एड्स किंवा HIV व्हायरसची लागण होऊ नये म्हणून काय करावे..?

एड्स रोगावर निश्चित असा उपचार नसल्याने त्यापासून बचाव करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
• आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त (म्हणजे पती आणि पत्नी) अन्य व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवू नका. ते शक्य नसल्यास, जोडीदाराव्यतिरिक्त अन्य व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करावा.
• वेश्या, मुखमैथुन, गुदामैथुन यासारख्या प्रवृत्तीपासून दूरच राहणे गरजेचे आहे.
• ‎रक्त घेण्यापुर्वी ते HIV संक्रमित नसल्याची खात्री करुन घ्यावी.
• ‎दुषित सुया, इंजेक्शन यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. इंजेक्शन घेताना प्रत्येक रुग्णाने सतर्कता दाखवावी. इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरींज आणि सुईचा वापर करावा.
• ‎अंगावर Tattoo गोंदवून घेताना नवीन सुया वापरल्या जातील याकडे लक्ष द्या.
• ‎सलूनमध्ये दाढी करून घेताना किंवा वस्तारा फिरवण्यापूर्वी नवीन ब्लेड वापरले आहे का याची खात्री करून घ्या.
• ‎गुप्तरोग झाला असल्यास त्यावर डॉक्टरकडे जाऊन त्वरित उपचार करावा.
• ‎मादक द्रव्यांचे सेवन करु नये.

गैरसमजही दूर करा..
• एड्स रुग्ण किंवा HIV ग्रस्त व्यक्तींबरोबर राहिल्याने, त्याच्या बरोबर जेवल्याने HIV ची लागण होत नाही.
• ‎HIV ग्रस्त रुग्णाच्या शिंका, खोकला किंवा थुंकीतून HIV ची लागण होत नाही.
• ‎एड्स बाधित व्यक्तीला डसलेला डास दुसऱ्या व्यक्तीला चावला तरी एड्स होत नाही.
• ‎हस्तमैथुन केल्यानेही HIV होत नाही.

– डॉ. सतिश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

एड्स कशामुळे होतो, एड्स म्हणजे काय, एचआयव्ही एड्स मराठी माहिती, एचआयव्ही लक्षणे, एडस लक्षणे कोणती, एडस माहिती, एच आय व्ही टेस्ट, लैंगिक आजार माहिती, एड्स (AIDS) आजाराची संपूर्ण माहिती मराठीत, लैंगिक शिक्षण म्हणजे काय, एचआयव्ही प्राथमिक लक्षणे ओळखावी, एच आय व्ही तपासणी, एड्स मराठी माहिती, एड्स ची लक्षणे मराठी, एच आय व्ही प्रमुख लक्षणे, एच आय व्ही उपचार मराठी माहिती, aids chi mahiti marathi, aids day information in marathi, aids information in marathi wikipedia, aids information in marathi pdf, aids kasa hoto, aids vishai mahiti, sexual diseases in marathi, aids information in konkani, aids kasa hoto in marathi, HIV information in marathi.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :