बाळंतपणानंतरची काळजी

6285
views

प्रेग्‍नेंसीनंतरही बाळंतणीची विशेष देखभाल करण्याची गरज असते. बाळंतपणानंतरही योग्य आहार घ्यावा तसेचं आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत. त्यांच्याकडून नियमित तपासणी करून घेणे आणि डॉक्टरांनी केलेल्या सुचनांचे पालन करणे गरजेचे असते.

ताप येणे, पोट साफ न होणे, लघवीला त्रास होणे तसेच अंगावरून जाने, पोटात दुखणे अशा समस्याही उदभवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नये. थोडयाशा उपचारांनी ह्या समस्या बऱ्या होतात.

बाळंतपणानंतरचा आहार :
स्त्रि‍यांना गर्भावस्थेत जेवढा पोषक आहार महत्वाचा असतो तेवढाचं बाळंतपणानंतर ही पोषक आहार गरजेचा असतो. आईच्या दुधातून बाळाच्या वाढीसाठी योग्य असे सर्व प्रकारचे घटक मिळतात. म्हणूनच प्रत्येक बाळंतपणानंतर जोपर्यंत बाळ अंगावर पीत असते. तोपर्यंत आईच्या आहाराचे खूप महत्त्व असते.

 • अशावेळी विटामिन, प्रोटीन युक्त सकस व चौरस आहार सेवन करावा.
 • दूध व दुग्धजन्य पदार्थ, लोणी, तुप इत्यादि पदार्थ खाणे आवश्यक त्यामुळे मातेमध्ये दुधाची निर्मिती चांगल्या प्रकारे होऊन त्याचा लाभ बालकास होईल.
 • दूध भरपूर येण्यासाठी हळीव, डिंकाचे लाडू, खारीक, खसखस, खोबरे हे पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे.
 • याशिवाय ताजी फळे, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या व सूप आहारात अधिक घ्या. त्याचबरोबर पाणीसुद्धा भरपूर प्यावे.
 • मांसाहार करत असल्यास अंडी व मांस आहारातून घ्या.

बाळंतपणानंतरही करावयाची तपासणी :
बाळाला जन्म देणं स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा असा क्षण असतो. बाळंतपणानंतर गर्भाशय हे हळूहळू आपल्या पुर्वीच्या अवस्थेला येऊ लागते. ही प्रक्रिया बाळंतपणानंतर सहा आठवडयांपर्यंत (42 दिवस ) चालू राहते. सहा आठवड्यानंतर डॉक्टर तपासणी करून शरीर पूर्वावस्थेत आले आहे की नाही हे तपासतात.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

तपासणीच्या वेळेस डॉक्टर खालील बाबी तपासतील :

 • आपले वजन, रक्तदाब, हिमोग्लोबिन, आणि आपल्या गर्भाशयाची तपासणी करतात.
 • तसेच प्रसूतीनंतर घ्यावयाचा आहार, करावयाचे व्यायाम, बाळाचे आरोग्य, स्तनपान, लसिकरण संबंधी माहितीही आपले डॉक्टर देतील.
 • बाळंतपणानंतरही आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या. त्यांच्याकडून नियमित तपासणी करून घ्या आणि आपल्या डॉक्टरांनी केलेल्या सुचनांचे पालन करा.
महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

बाळंतपणानंतरचा विहार व व्यायाम : 
बाळंतपणानंतर स्त्रीचे शरीर हे थोडेसे सैल पडते. अशावेळी थोड्यास्या व्यायामाची गरज असते.

 • यासाठी हातापायांची हालचाल करावी, चालण्याचा व्यायाम करावा, काही सोपी योगासने करावीत.
 • आपण बाळंतपणानंतर हळूहळू चालण्यास सुरवात करू शकता आणि चालताना आरामदायक चप्पल घालावे.
 • आजकाल गर्भावस्थेनंतर अधिकतर महिला आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र आपल्या डॉक्टरांच्या सुचनेशिवाय असा कोणताही व्यायाम करू नका की ज्यामुळे पुढे नविन समस्या निर्माण होईल. प्रेग्‍नेंसीमध्ये वाढलेले वजन कमी होण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल.
 • नोकरी करणाऱ्या स्त्रियां बाळंतपणानंतर 4-5 महिन्यानंतर पुन्हा ऑफिसला जाऊ शकतात.
 • आत्ता ‘मॅटर्निटी बेनिफिट्स अ‍ॅक्ट’ नुसार बाळंतपणानंतर 26 आठवडयांची (साडेसहा महिने) मातृत्व रजा मिळते.


प्रतिक्रिया द्या :