About Project

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला ‘डिजीटल इंडिया’ हा महान प्रकल्प समर्पित केला आहे.
त्यानुसार इंटरनेट, आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्टफोन इ. च्या माध्यमातून जनतेचे जीवन सुकर केले जाणार आहे. ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमामुळे केंद्र व राज्य सरकारच्या सेवा एकत्रितपणे शहरी तसेच ग्रामीण भागापर्यंत पोचू शकणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे देशात सामाजिक आणि आर्थिक सुधारणा होणार आहे.

MODI-DIGITAL-INDIA-BI2G1त्याताचं एक भाग म्हणून मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी हे ‘हेल्थ मराठी’ सामाजिक App जनतेस समर्पित केले आहे.
यामुळे जनतेस आरोग्याची माहिती सहजतेने मिळेल. आरोग्याविषयी जनजागृकता निर्माण होण्यास मदत होईल.
आरोग्य योजनांची लोकांपर्यंत माहिती पोहचण्यास मदत होईल.
व्यसनाधीनता, रक्तदान, अवयवदान, स्त्री-भ्रुण हत्या, कुपोषण यासारख्या सामाजिक प्रश्नांवर यामाध्यमातून आपण प्रभावी कार्य करण्यास मदत होणार आहे.

आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये लोकांकडून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे हृद्रोग, मधुमेह, कैन्सर सारखे नानाविध विकार होत असतात. आरोग्याविषयी माहिती असल्यास लोक आरोग्यविषयी जागरुक असतात. चांगल्या आरोग्यासाठी काय करावे, काय करु नये याचा विचार करतात. आरोग्य जनजागृतीसाठी आम्ही हा एक प्रयत्न केला आहे.

dada125541

 

‘हेल्थ मराठी’च्या माध्यमातून आरोग्याविषयी इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे असे आरोग्य आहे. त्यामुळे प्रत्येकाला आरोग्याविषयी सामान्य माहिती असणे आवश्यक असते. कारण उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती असते. आरोग्यासाठी चांगले काय आहे? वाईट काय आहे? या याचे सामान्य ज्ञान असल्याशिवाय उत्तम आरोग्य कसे राखता येईल.
आरोग्य उत्तम राखण्यासाठी, आरोग्य संपन्न राहण्यासाठीचे मार्गदर्शन या माध्यमातून केले जाणार आहे. यासाठी ‘ हेल्थ मराठी ‘ मध्ये विविध आरोग्यविषयक माहितीचा संग्रह केला आहे.

प्रमुख रोगांची माहिती –
‘हेल्थ मराठी ‘ मध्ये महत्वाच्या रोगांची माहिती दिली आहे. त्यांची कारणे, लक्षणे, निदान पद्धती, उपचारासंबंधी मार्गदर्शन याबरोबरच मुळात रोग उत्पन्नच होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे.

जीवनशैली मार्गदर्शन –
आहारासंबंधी सविस्तर माहिती येते देण्यात येणार आहे. आहारातील पोषकघटक, जीवनसत्वे, खनिजे इ. ची माहिती दिली जाणार आहे. प्रमुख आहारद्रव्यातील घटकांची सर्वांना कळेल अशी आणि उपयुक्त अशी माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे.
योग, व्यायामासंबधी उपयुक्त माहिती येथे उपलब्द केली जाणार आहे. रोगनिहाय योग आणि व्यायामांचे मार्गदर्शन येथे मिळणार आहे.

वैयक्तीक आरोग्य –
पुरुषांचे आरोग्य, पुरुषांसंबंधी विकारांची माहिती, स्त्रियांचे आरोग्य, स्त्रीसंबंधी विकार, गर्भावस्थासंबंधी आरोग्य मार्गदर्शन, मुलांचे आरोग्य या सर्वांची विस्तृत आरोग्यविषयक माहिती या माध्यमातून देण्यात येणार आहे. जेणेकरुन वैयक्तिक आरोग्याचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.

सामाजिक आरोग्य –
या माध्यमातून सामाजिक आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात येईल. धुम्रपान, मद्यपान यासारखी व्यसनाधिनता किंवा सामाजिक आरोग्य बिघडवणारी जलप्रदुषण वायुप्रदुषण ध्वनीप्रदुषण यांचा आरोग्यावरील परिणाम तसेच स्त्रीभ्रुण हत्या संबंधी समस्यांच्या परिणामांचे विश्लेषण येथे करण्यात येणार आहे. तसेच या समस्यांवरील उपाययोजनांचे सुद्धा मार्गदर्शन केले जाणार आहे.

आरोग्य योजनांची माहिती –
आरोग्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात. मात्र केवळ माहितीअभावी या योजनांचा लाभ होण्यापासून अनेक गरजू व्यक्ती वंचित राहतात. यासाठी या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्द सर्व योजनांची माहिती दिली जाणार आहे.

आरोग्य Extra –
विविध तपासण्यासंबंधी शंकांचे निरसण करण्यात येणार आहे. तसेच स्मार्ट हेल्थ टिप्स, हेल्थ फॅक्ट्स, Health advice द्वारे अधिकाधिक आरोग्याविषयक उपयुक्त आणि रंजक माहिती सर्वांसाठी खुली केली जाणार आहे.

आमचे ध्येय आणि उद्दिष्ठ्ये –
अधिकाधिक व्यक्तिंना आरोग्याच्या दृष्टीने जागरुक करुन त्यांना आरोग्यसंपंन्न बनविण्याचे आमचे उद्दिष्ठ आहे.