पौष्टिक आवळा

316
views

Aamla nutrition contents in Marathi [आवळा] –
आवळा हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हितकारी आहे. आयुर्वेदामध्ये यामुळेच आवळ्याला अत्यंत मानाचे स्थान आहे. तर सुप्रसिद्ध त्रिफळा चुर्णातील एक फळ हे आवळाच आहे.

आवळा पोषकतत्वे –
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन C असते.
आवळ्यामुळे आपली पचनशक्ती, स्मरणशक्ती चांगली राहते. मधुमेह, हृद्यविकार, मुतखडा, लघवीवेळी जळजळणे, मुळव्याध, पोटाचे विकार, अकाली वृद्धत्व येणे, केसांच्या समस्या यासारख्या अनेक विकारांवर आवळा लाभदायी आहे.

हितकारी आवळा –
आवळ्याच्या नित्य सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते. याशिवाय किडनी आणि यकृताचे कार्य व्यवस्थित होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील विषाक्त घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
मधुमेह आणि हृद्यविकार असणाऱ्यांनी आहारात आवळ्याचा समावेश करावा. याशिवाय मधुमेह रुग्णांनी आवळ्याचे चुर्ण हळदीसमवेत घेतल्यास विशेष लाभ जाणवतो.
तसेच आवळ्याच्या सेवनाने केस आणि डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते यासाठी आवळ्याचे नित्य सेवन करावे.


महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :