कामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)

43
views

राज्य कामगार विमा योजना ही कामगार वर्गाला सामाजिक आर्थिक सुरक्षितता पुरविण्यासाठी तयार केलेली बहुमुखी सामाजिक सुरक्षितता प्रणाली असून त्या अंतर्गत त्यांचे अवलंबित सुद्धा समाविष्ट आहेत. कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण वैद्यकीय देखभाली बरोबरच विमाधारक व्यक्तीचे आजारपण, तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व, इत्यादीमुळे कमाईच्या क्षमतेत झालेली घट व विमाधारक महिला विविध तऱ्हेचे रोख लाभ मिळण्यास पात्र असतात. औद्योगिक अपघात किंवा सेवेतील इजेमुळे किंवा व्यावसायिक जोखीमिमुळे मृत्यू पावणाऱ्या विमा धारक व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना अवलंबित्व लाभ नावाने दरमहा निवृत्ती वेतन दिले जाते.
राज्य विमा योजनेचे वैशिष्ट्य असे की त्यातील अंशदान हे वर्गणीदाराच्या क्षमतेवर अवलंबून कामगारांना देय असणाऱ्या वेतनाची ठराविक टक्केवारीच्या स्वरुपात असते तर मिळणारा सामाजिक सुरक्षिततेचा लाभ हा प्रत्येकाच्या गरजेनुसार कोणताही भेदभाव न करता दिला जातो.

योजनेविषयी –
राज्य कामगार विमा अधिनियम १९४८ अंतर्गत लागू करण्यात आलेली राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. सुरक्षिततेची भावना ही मनुष्य स्वभावात अनुस्युतच आहे. एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत चालल्यामुळे, औद्योगिकीकरण, व नागरीकरणामुळे आधुनिक काळात सुरक्षितता आवश्यक झाली आहे. १४ इस्पितळे, व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. महाराष्ट्रात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू आहे.
अंमलबजावणी केलेल्या क्षेत्रांमध्ये कामगारांना एक वैद्यकीय व समान दराने रोख स्वरुपात अशा दोन पद्धतीने लाभ दिला जातो. दहा किंवा जास्त कामगार असणाऱ्या सर्व कारखान्यांना राज्य विमा योजना अधिनियमाअंतर्गत अंतर्भूत करण्यात आले आहे. वरील सर्व आस्थापनांमध्ये ह्या योजनेत पात्र होण्यासाठी रु १५०००/- ही कमाल वेतन मर्यादा (ज्यादा काम वगळून) आहे.

लाभ :
वैद्यकीय लाभ
आजारपणाचे लाभ
अपंगत्वाचे लाभ
मातृत्वाचे लाभ
अवलंबितांचे लाभ
अंत्यविधीचे लाभ
अधिनियमाच्या कलम ४६ नुसार सहा प्रकारच्या सामाजिक सुरक्षा लाभांची तरतूद करण्यात आली आहे.

गर्भावस्थेसंबंधी सर्व माहिती 'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.

अ) वैद्यकीय लाभ :
विमित व्यक्तीला व त्याच्या कुटुंबियांना त्याने सेवेत प्रवेश केल्याच्या पहिल्या दिवसापासून वैद्यकीय देखभाल केली जाते. विमित व्यक्तीच्या किंवा त्याच्या कुटुंबियाच्या उपचाराच्या खर्चावर कोणतीही मर्यादा नाही. निवृत्त आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या विमित व्यक्तींना व त्यांच्या पत्नीला वर्षाला नाममात्र रु १२० हप्त्यामध्ये वैद्यकीय देखभाल केली जाते.
उपचाराची प्रणाली
वैद्यकीय लाभाचे मोजमाप
निवृत्त विमित व्यक्तींना लाभ
राज्यातील वैद्यकीय लाभाचे प्रशासन
अधिवासी उपचार
विशेषज्ञांकडून तपासणी
अंतर्रुग्ण उपचार
एक्सरे सेवा
कृत्रिम पाय व मदत
विशेष तरतुदी
प्रतिपूर्ती

(ब) आजारपणाचे लाभ :
विमित कामगारांना प्रमाणित आजारपणात वर्षामध्ये जास्तीतजास्त ९१ दिवसांपर्यंत वेतनाच्या ७०% दराने रोख स्वरुपात नुकसानभरपाई मिळू शकते. आजारपणाचे लाभ मिळण्यास पात्र होण्यासाठी ६ महिन्यांच्या अंशदान कालावधीमध्ये विमित कामगाराने ७८ दिवसांचे अंशदान दिलेले असले पाहिजे.

विस्तारीत आजारपणाचा लाभ :
३४ प्रकारच्या गंभीर व दीर्घ मुदतीच्या आजारांमध्ये वेतनाच्या ८०% दराने आजारपणाचा लाभ दोन वर्षेपर्यंत वाढविला जाऊ शकतो.

वाढीव आजारपणाचा लाभ :
नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या विमित पुरुष व महिला कामगारांना त्यांच्या वेतनाएवढा आजारपणाचा लाभ अनुक्रमे ७ व १४ दिवसांसाठी मिळू शकतो.

(क) मातृत्वाचा लाभ :
मागील वर्षात ७० दिवसांचे अंशदान केल्याच्या अधीन राहून पूर्ण वेतनाएवढ्या रकमेचा मातृत्व लाभ तीन महिन्यांसाठी पात्र असतो व वैद्यकीय सल्ल्यानुसार तो एक महिना वाढविता येऊ शकतो.

ड) अपंगत्वाचे लाभ
तात्पुरत्या अपंगत्वाचे लाभ :
सेवेतील इजा असल्यास अंशदान अदा केले असेल अगर नसेल, तरीसुद्धा विमित सेवेत प्रवेश केल्यापासून तात्पुरत्या अपंगत्वाचे लाभ मिळतील. अपंगत्व कायम असेपर्यंत वेतनाच्या ९०% रक्कम तात्पुरते अपंगत्व लाभ म्हणून देय असेल.

कायम अपंगत्वाचे लाभ :
वैद्यकीय मंडळाने प्रमाणित केलेल्या कमविण्याच्या क्षमतेतील घटीनुसार वेतनाच्या ९०% रक्कम लाभाच्या स्वरुपात दर महा दिली जाते.

ई) अवलंबीतांचे लाभ :
विमित व्यक्तीचे सेवेतील इजेमुळे किंवा नोकरीतील जोखिमीमुळे निधन झाले असल्यास मृत व्यक्तीवार अवलंबून असलेल्या अवलंबिताना वेतनाच्या ९०% दराने अवलंबिताचे लाभ दिले जातात.

फ) इतर लाभ :
अंत्येष्टीचा खर्च : मृत विमित व्यक्तीवरील अवलंबित किंवा त्याची अंत्येष्टी विधी करणाऱ्याला रु १००००/- पर्यन्त रक्कम दिली जाते. An amount of Rs.10,000/- is payable to the dependents or to the person who performs last rites from day one of entering insurable employment. प्रसुती खर्च : राज्य कामगार विमा योजनेखाली वैद्यकीय सेवा उपलब्ध नसतील अशा ठिकाणी विमित स्त्री किंवा विमित व्यक्तीची पत्नीची प्रसूति झाल्यास प्रसुती खर्च देण्यात येतो.
त्या व्यतिरिक्त विमित कामगारांना गरजेनुसार अन्य लाभ दिले जातात.

व्यावसायिक पुनर्वसन :
कायम स्वरूपाचे अपंगत्व आलेल्या व्यक्तींना व्यावसायिक पुनर्वसन प्रशिक्षण केंद्रामध्ये व्यावसायिक पुनर्वसन प्रशिक्षण घेण्यासाठी
शारीरिक पुनर्वसन :
सेवेतील इजेमुळे शारीरिक अपंगत्व आल्यास
वृद्धापकाळ वैद्यकीय देखभाल :
सेवानिवृत्ती किंवा ऐच्छिक सेवानिवृत्ती योजने अंतर्गत व कायम स्वरूपाच्या अपंगत्वामुळे सेवा त्याग करावा लागलेल्या विमित व्यक्तींसाठी व त्यांच्या पत्नीसाठी वार्षिक रु १२०/- भरून वैद्यकीय देखभाल उपलब्ध आहे.प्रतिक्रिया द्या :