सम्यक आरोग्यासाठी भाज्या शिजवा योग्य पद्धतीने

4267
views

उत्तम आरोग्यासाठी योग्य पद्धतीने आहार बनवणेही गरजेचे असते जेणेकरून त्या आहारातील पोषक घटकांचा आपल्या शरीराला सम्यक उपयोग होईल. पालेभाज्या व फळभाज्यामध्ये भरपूर प्रमाणातं पोषक घटक असतात.

भाज्या शिजवताना हे करा..

  • पालेभाज्या, फळभाज्या बाजारातून आणल्यावर पाण्याने स्वच्छ कराव्यात. त्यामुळे त्यावरील धूळ, केर, किटकनाशके निघून जातील.
  • पालेभाज्या जास्त बारीक चिरणे टाळावे. जेव्हा पालेभाज्या बारीक चिरल्या जातात तेंव्हा त्यातील पाचकरस (एन्झाइम) जास्त प्रमाणात त्या भाज्यातून निघुन बाहेर येतात आणि त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होतो.
  • चिरल्यानंतर भाज्या धुवू नयेत.
  • भाज्या पाण्यात घालून बराच वेळ ठेवणे किंवा भाजी चिरल्यानंतर धुणे यामुळे भाज्यांतील उपयुक्त जीवनसत्त्व कमी होते.
  • भाज्या जास्त शिजवू नयेत. भाज्या जास्त शिजवल्यामुळे त्यातील जीवनसत्त्व (Vitamins) कमी होतात.
  • एकदा केलेला आहार सारखे-सारखे गरम करू नये. तसे केल्याने त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.


प्रतिक्रिया द्या :